महाराष्ट्रानंतर झारखंड गेल्यानं भाजपवर ‘नाराज’ असलेल्या नाथाभाऊंचं दिल्ली दरबारी ‘वजन’ वाढलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपमध्ये गेल्या काही वर्षापासून नाराज असलेले एकनाथ खडसे आता बंडाच्या पवित्र्यात आहेत. गेल्या काही दिवसांपासून तर त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त करत पक्ष सोडण्यास भाग पाडू नका असा इशाराच पक्ष श्रेष्ठींना दिला आहे. गोपीनाथ गडावर झालेल्या भाषणात त्यांनी अतिशय स्पष्टपणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता.

महाराष्ट्रात युती तुटल्यानंतर राज्यातील सत्ता भाजपच्या हातून गेली. त्यातच झारखंडही हातून गेलाय. या पार्श्वभूमीवर खडेसे यांची नाराजी दूर करण्यासाठी आता थेट दिल्लीतून सूत्र हलली असून भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी खडसेंशी चर्चा करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. चर्चेसाठी नाराज खडसेंना खास दिल्लीत बोलावण्यात आले होते. नड्डा यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. खडसे आणि नड्डा यांनी राज्यातील राजकारणावर चर्चा झाली. या चर्चेत मी त्यांना राज्यातील सगळी वस्तूस्थिती सांगितली. त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक होता अशी माहिती खडसे यांनी दिली. पक्षश्रेष्ठींनी कारवाई केल्यावरच त्यांना मी किती समाधानी झालो हे कळेल असंही खडसे यांनी सांगितले.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कारण एकनाथ खडसे यांनी पक्षातील आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. तसेच एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरु असल्याची माहिती आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी खडसे यांच्याबाबत एक वक्तव्यावरून खळबळ उडवून दिली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/