खडसेंचा 2 ओळीचा राजीनामा पण शुद्धलेखनाच्या अनेक चुका, सोशल मीडियात ट्रोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणारे एकनाथ खडसे (eknath khadse) सध्या सोशल मीडियात (social media) भलतेच ट्रोल (trolls) होऊ लागले आहेत. एकनाथ खडसेंनी दिलेला राजीनामा (resigns) सर्वत्र व्हायरल होत आहे. हा राजीनामा फेटाळण्याची मागणी केली जाऊ लागली. त्याला कारण म्हणजे एकनाथ खडसेंनी लिहिलेल्या दोन ओळींच्या राजीनाम्यात मराठी (marathi) शुद्धलेखनाच्या (spelling mistakes) अनेक चुका आढळून आल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी खडसेंना ट्रोल केलं आहे.

एकनाथ खडसेंचा राजीनामा पत्र इंग्रजीत असते तर फक्त स्पेलिंगच्या चुकांसाठी ते गाजले असते, पण मराठीत शुद्धलेखन हे नेहमीच दुर्लक्षित केले जाते. परंतु दोन ओळींचा राजीनामा देताना पत्रात किती चुका असाव्यात ? असा संतप्त प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी याबाबत सोशल मीडियात आवाज उठवल्यानंतर नेटकऱ्यांनी एकनाथ खडसेंना चांगलेच धारेवर धरले आहे.

हेरंब कुलकर्णी (heramb kulkarni) यांनी पत्राबाबत म्हटल की,
1. प्रती शब्द प्रति हवा
2. वैयक्तीक शब्द वैयक्तिक हवा
3. प्राथमीक शब्द प्राथमिक हवा
4. ऑक्टोबर वर टिंब दिलाय तो नको
5. पत्राच्या वर महसुल शब्द महसूल हवा
6. कृषीमंत्री शब्द कसा लिहावा ?
7. विधानसभा हा शब्द जोडून हवा

सध्या सोशल मीडियावर खडसेंच्या राजीनाम्याचं पत्र प्रचंड व्हायरल होत आहे. यावर नेटिझन्स भाजपाची तसेच खडसेंची फिरकी घेताना दिसत आहेत. बहुतेक या पत्राची केंद्र सरकारकडून सीबीआय (CBI) चौकशी होणार असे विनोद केले जात आहेत. तर काहींनी मंत्रिपदावरील व्यक्ती ज्याला मराठी लिहिता येत नसेल तर मराठीत बोला सांगण्याचा आपल्याला हक्क आहे का ? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.