खडसेंच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या मुद्द्यावर, खासदार संभाजीराजे म्हणाले,..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पक्षावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath-khadse) यांनी आज अखेर भाजपाचा राजीनामा (bjp-quit) दिल्याची अधिकृत घोषणा केली. तसेच आपण शुक्रवारी (दि. 23) राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश (ncp-join) करत असल्याचं सांगत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिला. खडसे यांच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू आहे. यावर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले ((Bjp mp- chhatrapati sambhaji raje) यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, मी राष्ट्रपतीनियुक्त खासदार असून, मी राजकीय वक्तव्य करणार नाही. सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग मोकळा असल्याचे सांगत खडसे यांच्या पक्षांतराच्या मुद्याला बगल दिली.

खासदार संभाजीराजे यांची पुण्यात आज पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी राज्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतक-यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. त्याचबरोबर राज्य सरकारनं ओला दुष्काळ करून तातडीनं मदत करावी, अशी मागणी केली. मी राज्यातील शेतकरी वर्गाचे प्रश्न समजून घेण्यासाठी दौरे केले. त्या सर्वांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे असं संभाजी राजे यांनी सांगितलं. हाच धागा पकडत जळगाव येथील एक शेतकरी पक्ष सोडून गेले आहेत. तर त्यांच्या देखील समस्या जाणून घेणार का? कारण तेही शेतकरी आहेत, असा प्रश्न विचारला असता. त्यावर संभाजी राजे म्हणाले की, मी आता यावर राजकीय वक्तव्य करणार नाही. सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग मोकळा असल्याचे सांगत खडसे यांच्या पक्षांतराच्या मुद्यावर बोलणे टाळले.

….तर राजेंना सुखाने राहायचा अधिकार नाही : संभाजी राजे
आजवर आम्ही नवरात्रमध्ये कोल्हापूरमधून कधीच बाहेर पडलो नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी आदर्श घालून दिला आहे की, जगाचा पोशिंदा संकटात असताना आणि त्याला जर त्रास होत असेल, तर राजेंना सुखान राहायचा काही अधिकार नाही, अशी भूमिका खासदार संभाजी राजे यांनी मांडली. शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्याची लवकरच भेट घेणार असल्याचे देखील संभाजीराजे यांनी सांगितले.

You might also like