Eknath Khadse | राणा-कडू वादात एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘खोके देण्या-घेण्याचा व्यवहार एकनाथ शिंदेंच्या हातून…’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Khadse | आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) हे पैसे घेऊन गुवाहटीला गेले, असा आरोप भाजपा (BJP) समर्थक आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी केल्यानंतर राणा आणि कडू यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. भाजपाच्या मदतीने एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पैसे देऊन शिवसेनेचे (Shivsena) आणि इतर अपक्ष आमदार फोडले, असा अर्थ राणा यांच्या वक्तव्यातून निघत असल्याने एकुणच बंडखोर आमदारांमध्ये खळबळ उडाली आहे. आता राणा-कडू वादात राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे यांनी उडी घेतली असून त्यांनी मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे सध्या मेळघाट दौर्‍यावर आहेत. येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

 

एकनाथ खडसे यांनी खळबळजनक गौप्यस्फोट करताना म्हटले की, बच्चू कडू यांनी खोके घेतले की रवी राणा यांनी खोके घेतले याचे उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतील. कारण खोके देणे किंवा घेण्याचा व्यवहार एकनाथ शिंदे यांच्या हातातून झाला असल्याचे दिसते. यातील वस्तुस्थिती एकनाथ शिंदे, आमदार बच्चू कडू किंवा रवी राणा यांनाच माहिती असेल. (Eknath Khadse)

 

दरम्यान, गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी बच्चू कडूंवर केल्यानंतर बच्चू कडू यांनी राजापेठ पोलिसांत रवी राणा यांच्याविरोधात तक्रार केली.
बच्चू कडू यांनी पैसे घेऊन सरकारला पाठिंबा दिल्याचा आरोप रवी राणा यांनी केल्यानंतर बच्चू कडू संतप्त झाले आहेत.
कारण राणा हे भाजपा समर्थक आमदार मानले जातात. त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे लोकांना वाटू शकते.
म्हणूनच कडू यांनी याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे, अन्यथा कोर्टाची नोटीस पाठवण्याचा इशारा दिला आहे.

 

Web Title :- Eknath Khadse | serious allegations of eknath khadse on cm eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rohit Pawar | रोहित पवारांचे तानाजी सावंत आणि राम शिंदे यांना आव्हान

T20 World Cup 2022 | टीम इंडियाने झिम्बाब्वेला हलक्यात घेऊ नये, ‘या’ दिग्गज खेळाडूने दिला सल्ला

Bollywood News | बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याला पाहण्यासाठी गुजरातमध्ये चाहत्यांची उसळली गर्दी