विधानसभेतला मी सर्वात ‘भ्रष्ट’ आणि ‘नालायक’ आमदार : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे आणि दाऊद इब्राहिम सोबत संबंध असल्याच्या आरोपावरून भाजपाचे ज्येष्ठ नेते एखनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यातच मुख्यंत्र्यांसोबत पंगा घेणे त्यांना महागात पडले आहे. त्यामुळे मंत्रीमंडळाच्या विस्तारत देखील खडसेंना स्थान मिळाले नाही. त्यामुळे ते पक्षात एकाकी पडल्याचे दिसून येत आहेत. त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे ते बाजूला फेकले गेले आहेत. याविषयी खडसेंनी अनेकवेळा आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे.

मंगळवारी मुंबईतील सभागृहात बोलताना त्यांनी, विधानसभेत २८८ आमदार आहेत. या आमदारांपैकी मी सर्वात भ्रष्ट आणि नालायक आमदार म्हणून आज मी तुमच्या समोर उभा असल्याची खंत बोलून दाखवली. मागील ४० वर्षापासून मी आमदार आहे. आजपर्य़ंत मी कोणतीही निवडणूक हरलो नाही. सभागृहामध्ये आरोप-प्रत्यारोप होत असताता. मी विरोधी पक्ष नेता होतो त्यावेळी पुरावे देऊन आरोप केले. मात्र आपल्यावर झालेले आरोप बिनबुडाचे असून, बिनबुडाच्या आरोपामुळे काय वेदना होतात हे मला माहित आहे असे त्यांनी यावेळी सांगितलं.

माझ्यावर दाऊदच्या पत्नीशी संबंध असल्याचे आरोप करण्यात आले. तिला माझ्यासोबत का बोलाव वाटलं ते मला समजलेले नाही. एटीएस आणि इतर यंत्रणांनी माझी चौकशी केली. मात्र, या यंत्रणांना चौकशीत काहीच सिद्ध करता आले नाही. माझ्या पत्नीला बरे वाटले मात्र जे नुकसान व्हायचे होते ते होऊन गेल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एक इंच जमीन घेतली नसताना माझी आणि माझ्या कुटुंबीयांची अँटी करप्शनकडून दोनदा चौकशी झाली. माझ्या घरावर इन्कम टॅक्सची धाड पडली. मी जमीनदाराचा मुलगा आहे. माझ्याकडे शेतीव्यतीरीक्त कोणताही धंदा नसल्याचे सांगताना एकनाथ खडसे यांना गहिवरून आले.

चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी ‘हा’ फेसपॅक लावा ; जाणून घ्या प्रोसेस

रक्त शुद्ध करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

शहरातील सर्व बांधकामे तातडीने थांबवा – बाबा आढाव