मंत्रीपदाच्या स्वप्नामुळेच माझी ही अवस्था : एकनाथ खडसे

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा अमली निराशा व्यक्त केली आहे. चाळीस वर्षांच्या काळात अनेक मंत्रिपदे भूषवली. मात्र मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले म्हणून ही अवस्था झाली. अशी खंत त्यांनी व्यक्ती केली.

आगामी लोकसभा – विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. याचदरम्यान, जळगाव जिल्ह्यातील सावदामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित ‘एक शाम नाथाभाऊ के नाम’ या मुशायराच्या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे बोलत होते. त्यावेळी पुन्हा एकदा अमली निराशा व्यक्त केली असून, आपण मंत्रिपदावर असताना जाती-धर्माच्या आधारावर नव्हे तर मुस्लिम समाज मागास असल्याने सामाजिक भावनेतून आपण नेहमीच मुस्लिम समाजाच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, मंत्रिपदावर असताना मुस्लिम वख्त बोर्डाच्या महागड्या जमिनी ताब्यात घेत असताना त्यातील एका जमिनीवरील इमारत पाडण्याची नोटीस दिली होती, ती जमीन अंबानींची निघाली. यावेळी केलेली कारवाई आमच्याकडे काही जणांना आवडली नाही. त्यावेळी मोठा दबावही आला होता. मात्र सामाजिक भावनेतून आपण चांगले काम करण्याचा प्रयत्न केला होता. असे त्यांनी म्हंटले.

यादरम्यान, एका मुस्लिम कार्यकर्त्याने ‘पुढील काळात आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावे’ अशी इच्छा असल्याचे व्यक्त केले. त्यावेळी

चाळीस वर्षांच्या काळात अनेक मंत्रिपदं मिळाली, मात्र मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिले म्हणून कोणताही गुन्हा नसताना आपली ही अवस्था झाली, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा आपली खदखद व्यक्त केली आहे.मंत्रिपदाचे काय, येतात आणि जात असतात. ४० वर्षांच्या काळात आपण अनेक मंत्रिपद भूषवली. मुख्यमंत्रीही होऊ, मात्र मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहिल्यामुळेच आपण कोणताही गुन्हा केलेला नसतानाही आपली अशी अवस्था झाली. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.