‘नाथाभाऊ आमचे नेते होते, त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा,’ भाजपानं दिला निरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांनी आज भाजपचा राजीनामा दिला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजप ( BJP) मध्ये राहावे म्हूणन शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आला पण त्यांचं सगळं ठरलं होतं त्यामुळे खडसेंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत अशा शब्दात भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांच्याकडून खडसेंच्या राष्ट्रवादी (NCP) प्रवेशावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. केशव उपाध्ये म्हणाले की, कोणताही नेता अथवा कार्यकर्ता पक्षातून बाहेर पडतो त्याचा आनंद निश्चित नसतो. एकनाथ खडसेंवर अन्याय झाला आहे कि नाही हा व्यक्तिसाक्षेप निर्णय असू शकतो पण प्रदेशाध्यक्ष सातत्याने त्यांच्या संपर्कात होते. संघटनेला कोणताही त्रास होणार नाही असा निर्णय होऊ नये यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. परंतु एकनाथ खडसेंचा पक्ष सोडण्याचा निर्णय झाला होता त्यामुळे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहे. आम्हाला शेवटपर्यंत आशा होती एकनाथ खडसे पक्षात राहतील पण त्यांचा निर्णय पहिलाच झाला होता. संघटनेने एकनाथ खडसेंसाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व केले तसेच खडसेंना डावलून कोणताही निर्णय घेतला नाही असं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आले.

शरद पवारां ( Sharad Pawar) च्या उपस्थितीत होणार खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
एकनाथ खडसे भाजपचा राजीनामा देऊन शुक्रवारी दुपारी २ वाजता अधिकृतरीत्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. अनेक वर्षांचा अनुभवी नेता, राज्यातील विविध विषयाचा अभ्यास असणारा नेता राष्ट्रवादीत येत आहे, त्यांचे स्वागत आम्ही करतो. खडसेंच्या येण्याने राष्ट्रवादीला बळ मिळेल. राष्ट्रवादीकडून त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल असं राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil) यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

महाविकास आघाडी ( Mahavikas Aaghadi) च्या कुटुंबात आल्याचे स्वागत – मुख्यमंत्री
एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने आनंद आहे. त्यांचे महाविकास आघाडीच्या कुटुंबात स्वागत आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्याकडून एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर एकनाथ खडसेंना काय मिळणार ?
राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर पाठवण्यात येईल, इतकचं नाही तर त्यानंतर मंत्रिमंडळात खडसेंचा समावेशदेखील करण्यात येईल. तसेच शिवसेना-राष्ट्रवादी खात्यांची अदलाबदल करून एकनाथ खडसेंना कृषिमंत्री पद देण्यात येणार असल्याचीही चर्चा सुरु आहे.

शरद पवार ( Sharad Pawar) काय म्हणाले ?
एकनाथ खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. एकनाथ खडसेंच भाजपच्या उभारणीत मोठं योगदान आहे. विरोधकांच्या बाजूने एकनाथ खडसे प्रखरतेने दिसत होते, पण दुर्देवाने त्यांची नोंद घेण्यात आली नाही असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी जिथे नोंद घेतली जाईल तिथे जाण्याची भूमिका असू शकते. शरद पवारांच्या ह्या विधानामुळे खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले होते.

ऑडिओ क्लिप ( Audio Clip) वायरल
एकनाथ खडसेंना भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान मिळाले नाही त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले होते. त्यापैकीच, एका समर्थकाने थेट खडसेंना फोन करुन राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात विचारणा केली होती त्यावर, अगोदर तिकडून प्रस्ताव तर येऊ द्या, ते आपल्याला मानाचं स्थान देणार का, याची खात्री करुनच आपण प्रवेश करूया, असे खडसेंनी स्पष्ट केले होते. सोशल मीडियावर हि ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात वायरल झाली होती.