एकनाथ खडसेंबाबत सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा ‘दावा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे मागील काही वर्षापासून पक्षावर नाराज आहेत. नाराज खडसे यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न पक्षाकडून केले जात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार हे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. खडसे यांच्या नाराजीबाबत बोलताना मुनगंटीवार म्हमाले, आम्ही एकनाथ खडसेंची नाराजी दूर करणार आहोत. शिवाय येणाऱ्या काळात खडसे राज्याच्या विधीमंडळात किंवा दिल्लीत दिसू शकतील असा दावा मुनगंटीवार यांनी केला आहे.

एकनाथ खडसे यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार आहोत. त्याबाबत मी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी बोललो आहे. पक्षातील कोणताही नेत्याची, कार्यकर्त्याची कोणत्या कारणावरुन नाराजी असल्यास आपण ती संवादातून दूर करायला पाहिजे असे चंद्रकांत पाटील यांना सांगितले असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

नाराज एकनाथ खडसे यांच्यासोबत पक्षातील प्रमुख नेते चर्चा करणार आहेत. खडसे हे भाजपचे मोठे नेते आहेत. मागील चाळीस वर्षापासून त्यांनी राज्यात पक्ष विस्तारासाठी काम केले आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. त्यामुळे खडसे जर नाराज असतील, तर संवादाने हा प्रश्न मिटायला हवा, असेही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. मुनगंटीवार पुढे म्हणाले, खडसे हे आक्रमक नेते आहेत. त्याच्या आक्रमकपणाचा पक्षाला फायदा होईल. खडसे भाजप सोडणार नाहीत. ते भाजपवासी आहे, ते कुठेही जाणार नाहीत असेही त्यांनी सांगितले.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा –https://www.facebook.com/policenama/