…तर एकनाथ खडसे यांना पंतप्रधानही व्हावेसे वाटेल

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन

एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रीच काय, पंतप्रधानही व्हावेसे वाटेल, परंतु भारतीय जनता पक्षात कोणत्याही पदावर नियुक्तीचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडूनच घेतला जातो. पक्षात अनेक ज्येष्ठ नेते असतानाही नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले, या शब्दांत राज्याचे जलसंपदामंत्री  गिरीश महाजन यांनी खडसे यांना टोला लगावला.

[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’de3376d6-992e-11e8-8dcf-e775f1ec3574′]

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी महाजन नाशिकला आले होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जळगावमधील एका कार्यक्रमात खडसे यांनी ज्येष्ठतेनुसार आपणच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचे विधान केले होते. त्याविषयी महाजन यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी राजकारणात सर्वांनाच मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान व्हावेसे वाटते, असे सांगितले. भाजपमध्ये कोणत्याही पदनियुक्तीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. त्यामुळेच केंद्रीय मंत्रिमंडळात आणि मंत्रिमंडळाबाहेर अनेक ज्येष्ठ नेते असतानाही नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदी कायम राहणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.