जळगावातील भाजपच्या बैठकीला एकनाथ खडसे ‘गैरहजर’, उलट-सुलट चर्चेला ‘उधाण’

0
20
abdul sattar
File Photo

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेत भाजपला सर्वाधिक जागा मिळून देखील विरोधी पक्षात बसावे लागले. त्यानंतर भाजपने आता संघटात्मक मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपची आज उत्तरमहाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांची बैठक जळगाव येथे पार पडली. यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यातील भाजप जिल्हाध्यक्ष आणि संघटनेतील इतर पदाधिकारी उपस्थित होते. मात्र या बैठकीसाठी भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे उपस्थित होते.

भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित ही संघटनात्मक बैठक पार पडली. जिल्हास्तरीय संघटनात्मक बैठकींमध्ये सुरुवातील धुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. ठरलेल्या वेळेपेक्षा दोन तास उशिरा सुरु होऊन देखील एकनाथ खडसे हे या बैठकीसाठी अनुपस्थित होते.

एकनाथ खडसे यांनी भाजपवर विधानसभेच्या निकालानंतर घणाघाती टीका केली होती. फक्त भाजपच नाही तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील खडसेंनी नाव न घेता टिका केली होती. मात्र त्यांनी आपण भाजप हा पक्ष कदापी सोडणार नाही नेहमीच भाजप सोबत असणार असे देखील म्हंटले होते. विशेष म्हणजे खडसेंनी काही दिवसांपूर्वी माजी मंत्री पंकजा मुंडे यांची देखील भेट घेतली होती.

Visit : Policenama.com