सभागृह नेते एकनाथ पवार यांचा तडकाफडकी राजीनामा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे गटनेते तथा सभागृह नेते एकनाथ पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. याबाबतची माहिती पवार यांनीच आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिली.

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली. भाजपची सत्ता येताच निष्ठावान असलेल्या पवार यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती झाली होती. त्यांना तीन वर्षाचा कार्यकाळ मिळाला. त्यांनी आज तडकाफडकी राजीनामा देण्याची घोषणा केली. पवार यांनी भाजपचे शहराध्यक्षपद भूषविले आहे.