Eknath Shinde | शिवसेनेच्या विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी भरत गोगावले यांची नियुक्ती; एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde | शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. सत्तानाट्याला आता चांगलाच वेग आल्याचे दिसत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी एक नवं ट्विट जारी केलं आहे, त्या ट्विटमुळे आता राज्यातील नव्या चर्चेला तोंड फूटलं आहे.

 

शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले (MLA Bharat Gogavale) यांची नियुक्ती करण्यात आलीय. एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचं शिंदे यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की,
“शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री. भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सबब, श्री. सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.” असं ते म्हणाले आहेत.

 

Web Title :- Eknath Shinde | Appointment of Bharat Gogavale as the Chief Representative of Shiv Sena Legislature Information given by Eknath Shinde

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा