Eknath Shinde | मोठी बातमी ! राजकारणात नवा ट्विस्ट; एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, संध्याकाळी 7.30 वाजता शपथविधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde | देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. यानंतर राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना पेढा भरवून अभिनंदन केलं. दरम्यान शपथविधी आधी फडणवीस आणि शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे असणार आहेत. याबाबत घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

 

राज्याच्या राजकारणात आताही मोठी घडामोड दिसून येत आहे. संपूर्ण राज्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार अशा मोठ्या चर्चा पसरल्या होत्या. दरम्यान ऐन वेळी राजकारणात नवा ट्विस्ट समोर आल्याचे दिसले. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी असतील. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

 

 

Web Title :- Eknath Shinde | Big news! A new twist in politics; Eknath Shinde, the new Chief Minister of Maharashtra, will be sworn in at 7.30 pm

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक

 

Maharashtra Government Formation | अखेर ठरलं ! देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा शपथविधी आजच संध्याकाळी होणार

 

RBI पॉलिसीने तुटू शकते शेअर मार्केटचे ’सुरक्षा जाळे’, रिटेल गुंतवणुकदार जाऊ शकतात शेअर बाजारापासून दूर