Eknath Shinde Cabinet | शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपकडून ‘या’ चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता, शपथविधीचा मुहूर्त ठरला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde Cabinet | राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली. दोघांनी पदभार स्वीकारल्यानंतर नव्या सरकारचा मंत्रिमंडळाचा (Eknath Shinde Cabinet) शपथविधी चार किंवा पाच जुलैला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून नेमकं कोणकोणत्या नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे भाजपकडून (BJP) नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे समजतेय.

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी असल्याने त्यांचा नव्या मंत्रिमंडळात (Eknath Shinde) समावेश होणार नसल्याचे बोलले जात आहे. तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), आशिष शेलार (Ashish Shelar), गिरीश महाजन (Girish Mahajan), जयकुमार रावल (Jayakumar Rawal), अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar), मनिषा चौधरी (Manisha Chaudhary) यांच्या नावाची चर्चा आहे.

 

दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाकडून दीपक केसरकर (Deepak Kesarkar), उदय सामंत (Uday Samant),
गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), दादा भुसे (Dada Bhuse), शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)
यांच्यासह संजय शिरसाट (Sanjay Shirsat), अब्दुल सत्तार (Abdul Sattar), बच्चू कडू (Bacchu Kadu)
यांच्या नावाची चर्चा आहे.

 

Web Title :- Eknath Shinde Cabinet | swearing in ceremony of the eknath shinde cabinet likely to held on 4th or 5th july

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jyotiraditya Scindia | केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले – ‘मराठा म्हणून एकनाथ शिंदे…’

 

Pune Crime | भर रस्त्यात महिलेने स्वत:चा टॉप फाडून केली महिला पोलिसांना मारहाण; वडगावशेरी परिसरातील घटना

 

Dia Mirza Traditional Look | दिया मिर्झाच्या पारंपारिक लूकनं वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके, पाहा व्हायरल फोटो…

 

Pune News | दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप; ‘द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन’ व ‘सेवा सहयोग संस्थे’चा उपक्रम