Eknath Shinde | शिंदे गटासाठी ‘ती’ महासत्ता अखेर सरसावली, मोदी सरकारकडून शिवसेनेतील बंडखोरांना ‘कव्हर’ करण्याचे आदेश जारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde | शिवसेनेतील (Shivsena) बंडाच्या पाठीमागे भाजपाचा (BJP) हात आहे, हे उघड सत्य आहे. मात्र, भाजपाकडून आतापर्यंत आमचा काहीएक संबंध नसल्याचे सांगितले जात होते. शिवाय, बंडखोर गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील भाजपाचे नाव घेत नव्हते. आमच्या पाठीमागे एक महासत्ता आहे, असे बंडखोर म्हणत होते. अखेर ही महासत्ता कोण हे उघड झाले आहे. शिवसेनेतील या बंडखोर आमदारांसाठी भाजपा नेते आणि गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांनी महत्वाचे आदेश जारी केले आहेत. यानिमित्ताने केंद्राने शिवसेना विरूद्ध शिंदेगटाच्या वादात एंट्री केली आहे.

 

आपल्यासोबत असलेल्या शिवसेनेच्या आमदारांची सुरक्षा राज्य सरकारने काढून घेतल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता. यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत कोणाचीही सुरक्षा काढली नसल्याचे सांगितले होते. आता मोदी सरकारने शिवसेनेच्या 15 बंडखोर आमदारांच्या घरांच्या बाहेर सीआरपीएफचे जवान तैनात केले आहेत. अमित शाहांच्या गृह मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत. (Eknath Shinde)

 

राज्यात शिवसैनिक आक्रमक झाल्याने गुवाहाटीत असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार चिंताग्रस्त झाले आहेत.
त्यांच्या येथील कार्यालयांवर संतप्त शिवसैनिक हल्ले करत आहेत.
यामुळे बंडखोर आमदारांना त्यांच्या कुटुंबियांची देखील चिंता वाटत असून राज्यात परतण्यासाठी सुद्धा भीती वाटू लागली आहे.
काल दीपक केसरकर यांच्या घरावर हल्ला झाला. तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
एकनाथ शिंदेच्या मुलाच्या कार्यालयावर सुद्धा हल्ला करण्यात आला.

 

यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 15 आमदारांच्या निवासस्थानांना संरक्षण पुरवले आहे.
आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे.
आमदार सदा सरवणकर, रमेश बोरनारे, मंगेश कुडाळकर, संजय शिरसाट, लताबाई सोनावणे, प्रकाश सुर्वेसह आणखी 9 जणांच्या घराबाहेर सीआरपीएफचा बंदोबस्त तैनात केला आहे.
विशेष म्हणजे ज्या आमदारांची ईडीकडून चौकशी सुरू आहे त्यांनाही केंद्राकडून संरक्षण मिळाल्याने सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे.

 

या बंडखोरीमागे भाजपाचा हात – सावंत

बंडखोर आमदारांना केंद्रातील मोदी सरकारने संरक्षण पुरवल्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली आहे त्यांनी म्हटले की, या संपूर्ण कारस्थानामागे भाजप असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न राज्य सरकारच्या अखत्यारित आहे.
मात्र राज्य सरकारवर मुद्दामहून अविश्वास दाखवला जात आहे. शिवसेनेविरोधात बोलणार्‍यांना केंद्र कायम संरक्षण देत आहे.
आम्हाला काही म्हणायचे नाही. आणखी 50 जणांना संरक्षण द्यावे.

 

Web Title :- Eknath Shinde | centre government grants y plus crpf cover to 15 rebel shiv sena mlas maharashtra political crisis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा