Eknath Shinde | उद्धव ठाकरेंनी झेड सुरक्षा नाकारली का? शंभुराजे देसाईंच्या दाव्यावर CM एकनाथ शिंदे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोर आमदारांवर आक्रम टीका सुरू केल्याने शिंदे गटाने (Eknath Shinde) सुद्धा त्यांना प्रत्युत्तर देऊन ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. कालच आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौर्‍यापूर्वी तेथील शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी, एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांची धमकी आलेली असतानाही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी झेड सुरक्षा नाकरल्याचा आरोप केला होता, त्यास तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनीही दुजोरा दिला होता. यावर आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. (Eknath Shinde)

 

तुमच्या जीवाला धोका असताना उद्धव ठाकरेंनी झेड सुरक्षा नाकारली का? असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला असता ते म्हणाले, सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी जे भाष्य केले त्यावर तत्कालीन गृहराज्यमंत्री संभुराज देसाई (MLA Sambhuraj Desai) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी गेली काही वर्षे पालकमंत्री म्हणून काम करत होतो. तेथे आपल्या पोलिसांनी नक्षलविरोधी मोहीम तीव्र केली होती. सी 60 जवानांनी 27 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. गडचिरोलीत नक्षलवाद कमी करणे, त्या भागाचा विकास करणे आणि उद्योग सुरू करणे हा माझा उद्देश होता. (Eknath Shinde)

नक्षलवाद्यांना मारणार्‍या पोलिसांचा मी सन्मान केला आणि 51 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्यामुळे नक्षलवाद्यांनी मला धमकीचे पत्र दिले होते. मला यापूर्वी देखील अशा धमक्या आल्या होत्या. मी अशा धमक्यांना भीक घातली नाही. त्यामुळे पोलिसांच्या समितीने मला झेड सुरक्षा देण्याची शिफारस केली होती. ती बैठक शंभुराजे देसाई यांनी घेतली होती. याबाबत शंभुराजे देसाईंनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

 

गडचिरोलीचे तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धोका असल्याचा अहवाल आल्यानंतर
त्यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा पुरविण्याची गृहमंत्रालयाची तयारी होती. पण तेव्हा उद्धव ठाकरे यांनी सुरक्षा देण्यास नकार
दिल्याचा गौप्यस्फोट राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आमदार शंभूराज देसाई यांनी काल सातार्‍यात केला होता.

 

Web Title :- Eknath Shinde | CM eknath shinde comment on allegation of z security rejection by uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | चंद्रकांत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण

 

Devendra Fadnavis | एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय अचानक झाला नाही, देवेंद्र फडणवीसांचा खुलासा

 

Ramdas Kadam | 1995 मध्येच राज-उद्धव ठाकरेंमध्ये मतभेद? – रामदास कदम