Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा थेट इशारा; म्हणाले – ‘माझ्याकडे असे कलाकार, तुम्हाला कळणारही नाही…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पक्षातील बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) आणि पक्षाचे निष्ठावंत नेते आक्रमक झाले असून ते सातत्याने शिंदे गटावर (Shinde Group) प्रहार करत आहेत. परंतु आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्याकडून या टिकेला खुपच संयमीत उत्तर दिले जात होते. आता मात्र बंडखोर नेते (Rebel Leader) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेला थेट इशारा दिला आहे. मला फोडाफोडी करायची नाही, पण मी असाच बसणार नाही. माझ्याकडे अनेक पर्याय आहे. माझ्याकडे असे अनेक कलाकार आहेत, त्यांची कलाकारी तुम्हाला कळणारही नाही, असा थेट इशारा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना नेतृत्वाला दिला आहे.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांना आव्हान देताना शिंदे यांनी म्हटले की, आमच्यात फूट पडावी यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवलेत. देवीने कुणाचा बळी घेतला ? आता देखील काहीही बडबडत आहेत. माझ्या सोबत आलेला एकही आमदार पुन्हा निवडून येणार नाही, असे म्हणतात. मी म्हणतो, यातील एकही पराभूत होणार नाही. एकजरी पराभूत झाला तरी हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राजकारण सोडून देईल.

 

माझे भाषण पंतप्रधानांनी (PM) पूर्ण पाहिले. मी मनापासून बोलत होतो, म्हणून पाहिले, असे ते म्हणाले.
मी किती काळ आहे हे ठरवणारे तुम्ही कोण ? याची चिंता जनता करेल. कोर्टाने यांना पळवून लावले आहे.
जिंकलो आम्ही आणि फटाके ते वाजवत आहेत, हसावे की रडावे हेच कळत नाही.

शिंदे म्हणाले, तुमच्या मतदारसंघात एकही काम शिल्लक राहणार नाही. थोडीफार कामे शिल्लक ठेवा, नाहीतर लोक नंतर विसरतील.
मुख्यमंत्रीपदासाठी मी गेलोच नव्हतो.
खूप लोकांनी सांगितले असे करा, तसे करा, मात्र आम्ही सावध राहिलो.

 

शिवसेना नेतृत्वावर थेट आरोप करताना शिंदे म्हणाले, मी त्यांना एकदा नाही तर पाचवेळा समजावले होते.
मग शिवसेनेला वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. माझ्याकडे अधिकार नव्हते, पण मी शिवसेनेच्या लोकांना वेळ द्यायचो, ऐकून घ्यायचो.
थोडा निधी द्यायला लागलो, तर ते देखील या लोकांना पहावले नाही.

 

शिवसेना आम्ही मोठी केली असा दावा करत शिंदे म्हणाले, एकनाथ शिंदेवर शंभरपेक्षा जास्त केसेस आहेत.
वयाच्या 21 व्या वर्षी मी 40 दिवस जेलमध्ये होतो.
आमच्या बापांची नावे घेतली गेली. मला संघटनेसाठी मुलांनाही वेळ देता आला नाही.
माझ्या कुटुंबाने मला साथ दिली. प्रत्येक क्षण शिवसेनेसाठी दिला म्हणून शिवसेना मोठी झाली.
याच लोकांना बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) मोठे केले आणि याच लोकांनी बाळासाहेबांची शिवसेना मोठी केली.

 

Web Title :- Eknath Shinde | CM eknath shindes latest speech eknath shindes direct warning to shiv sena party chief uddhav thackeray sanjay raut and mva leaders

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा