Eknath Shinde CM | ‘मी एकनाथ संभाजी शिंदे…’ एकनाश शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; देवेंद्र फडणवीस पुन्हा आले पण उपमुख्यमंत्री बनून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde CM) यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) व धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आशिर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde CM) शपथ घेतो, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी शिंदे यांना शपथ दिली. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली. केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

 

या शपथविधी सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), आशिष शेलार (Ashish Shelar), पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासह भाजपातील इतर नेते उपस्थित होते. तसेच या शपथविधी समारंभाला एकनाथ शिंदे (Eknath Shinde CM) यांचे संपूर्ण कुटुंब हजर होते. या समारंभासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांना आमंत्रित केले होते. उद्धव ठाकरे उपस्थित राहतील अशी शक्यता होती. मात्र, उद्धव ठाकरे या समारंभाला (Oath Ceremony) उपस्थित राहिले नाहीत.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये सरकारमध्ये सहभागी होणार नाही असे सांगितले होते.
मात्र भाजपच्या वरिष्ठांनी आग्रह केल्याने त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्विकारली.
भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा (BJP President J.P. Nadda) यांनी फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पद स्विकारावं असं आग्रह केला होता.
यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah)
यांनी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी होतील अशी माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली.

 

Web Title :- Eknath Shinde CM | oath ceremony at raj bhavan devendra fadnavis takes oath as the deputy chief minister of maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Changes From July 1 | क्रिप्टोकरन्सी, पॅन-आधार लिंक, प्लास्टिक बॅन आणि नवीन कामगार कायदा…जाणून घ्या 1 जुलैपासून होणार कोण-कोणते बदल

 

Eknath Shinde CM |  … म्हणून भाजपने एकनाथ शिंदेंच्या हाती दिली सत्तेची सूत्रं, ‘ही’ आहेत 4 कारणे

 

Gold Silver Price Today | सोने 51 हजारच्या खाली आले, चांदीत झाली मोठी घसरण, जाणून घ्या नवीन दर