Eknath Shinde-Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी चालू पत्रकार परिषदेत केली एकनाथ शिंदेंच्या कानात कुजबूज, व्हायरल झाला व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde-Devendra Fadnavis | एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या पत्रकार परिषदा सतत चर्चेत येत आहेत.
फडणवीस यांना सतत मुख्यमंत्री शिंदे यांना मार्गदर्शन करावे लागत असल्याचे दिसत आहे.
सर्वात पहिल्या पत्रकार परिषदेत तर फडणवीस यांनी शिंदेंच्या हातातील माईक अचानक घेऊन पत्रकारांनी विचारलेल्या अडचणीच्या प्रश्नातून शिंदेंना मार्ग काढून दिला होता. (Eknath Shinde-Devendra Fadnavis)

 

त्यानंतर काल – परवा फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत कागदावर मजकूर लिहून शिंदेंना काहीतरी सांगितले आहे.
आजच्या पत्रकार परिषदेत पुन्हा शिंदेंच्या कानात फडणवीस यांनी कुजबुज करत सूचना केल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.

 

फडणवीस यांना सतत मुख्यमंत्री शिंदे यांना सावरून घ्यावे लागत असल्याचे या प्रकारांवरून दिसून येत आहे.
शिवाय, अशीही चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे की,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार काम करतात. (Eknath Shinde-Devendra Fadnavis)

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजीनगर,
उस्मानाबाद शहराला धाराशिव तर नवी मुंबई विमानतळाला नाव लोकनेते दि. बा. पाटील असे नाव देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

मात्र, मुख्यमंत्री आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगायचे विसरून गेल्याने फडणवीस यांना तो मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या कानात कुजबुज करून सांगावा लागला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या कानात
आठवण करून दिली की, एमएमआरडीएचा विषय राहिला आहे.
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

 

Web Title :- Eknath Shinde-Devendra Fadnavis | cm eknath shinde and deputy cm devendra fadnavis press conference silently takling in ear viral video

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा