Eknath Shinde | ‘… तेव्हा मोठा राजकीय भूकंप होईल – CM एकनाथ शिंदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde | मी मुलाखत देईन तेव्हा मोठा राजकीय भूकंप होईल. आनंद दिघे (Anand Dighe) यांच्याबाबत काय राजकारण (Politics) झाले याचा लवकरच खुलासा करेन, असाा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या राज्याच्या दौर्‍यावर असून त्यांनी आज मालेगावमध्ये सभेला संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी पक्षातील बंडखोरीनंतर आक्रमक पवित्रा घेतला असून ते सातत्याने बंडखोर आमदारांवर (Rebel MLA) शाब्दिक प्रहार करत आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तर ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना गद्दार म्हणत त्यांचे वाभाडे काढले होते. या वरून पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

 

आज ते मालेगाव (Malegaon) येथे बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही गद्दारी केली असती तर राज्यभरातून समर्थन मिळाले नसते. राज्यातून आम्हाला समर्थन का मिळते याचा विचार तुम्ही करा. शिवसेना (Shiv Sena) अशीच मोठी झाली नाही, त्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावली आहे. शिवसेनाला मोठे करण्यासाठी दिवस-रात्र एक केली आहे. त्यामुळे बंडाचा शिक्का आमच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न करु नका. तुम्ही जनतेचा विश्वासघात केला आहे. आमची भूमिका कुणाच्याही विरोधात नाही.

शिंदे पुढे ते म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीशी (Congress-NCP) मैत्री नको ही बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची भूमिका होती
मात्र उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी मैत्री करुन मुख्यमंत्री पद मिळवले आहे.
त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
अनेकवेळा उद्धव ठाकरे यांच्यासमोर भूमिका मांडली होती. मात्र आमच्याकडे दुर्लक्ष झाले.

 

शेतकर्‍यांच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि दिघे यांच्या विचारांवर पुढे जात आहोत.
त्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही. अतिवृष्टीचे पंचनामे 100 टक्के पूर्ण झाले आहेत.
जनेतेला न्याय देणासाठी आम्ही महामंडळ स्थापन करणार आहोत.
दादा भुसे, उदय सामंत (Dada Bhuse, Udaya Samant) यांच्यावर या महामंडळाची जबाबदारी असणार आहे.

 

Web Title :- Eknath Shinde | eknath shinde criticized to shivsena chief uddhav thackeray on shiv sena and statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar On Bhagat Singh Koshyari | कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

 

MLA Ravi Rana On Bhagat Singh Koshyari | ‘राज्यपाल एक सरळ, सज्जन व्यक्तिमत्व’ – आमदार रवी राणा

 

Arjun Khotkar | ‘उद्धव ठाकरेंशी बोलून CM एकनाथ शिंदेंना पाठिंब्याचा निर्णय’ – अर्जुन खोतकर