Eknath Shinde Government | शिंदे-फडणवीस सरकार CBI वरील बंदी उठवणार? उद्धव ठाकरेंसह मविआला आणखी एक धक्का

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde Government | राज्यात एकनाथ शिंदे सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे (Maha Vikas Aghadi Govt) निर्णय बदलण्याचा सपाटा लावला आहे. महाविकास आघाडी सरकारचे अनेक निर्णय एकनाथ शिंदे सरकारकडून (Eknath Shinde Government) बदलण्यात आले आहेत. आता यामध्ये आणखी एका निर्णयाची भर पडणार असल्याचे सूत्रांकडून समजते. ठाकरे सरकरानं (Thackeray Government) सीबीआयला राज्य शासनाची परवानगी घेतल्याशिवया तपास (CBI Investigation) करता येणार नाही, असा निर्णय घेतला होता. तो निर्णय बदलण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

महाविकास आघाडी सरकारने राज्यात तपास करण्यासाठी सीबीआयला बंदी घातली होती. एकनाथ शिंदे सरकार (Eknath Shinde Government) सीबीआयला राज्यात तपासासाठी परवानगी देणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे सरकारच्या काळात सीबीआयच्या तपासावर घातलेली बंदी उठवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

 

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने 21 ऑक्टोबर 2020 रोजी सीबीआयला राज्यात तपास करण्यासाठी राज्य सरकारची (State Govt) परवानगी घेणं आवश्यक असल्याचा निर्णय घेण्यात आला होता.
ठाकरे सरकार सत्तेत असताना परवानगीशिवाय राज्यात सीबीआयला तपासणीचे अधिकार नव्हते.
मात्र आता राज्यात ठाकरे सरकार पायउतार होऊन शिंदे सरकार आलं आहे.

 

राज्यात आता एकनाथ शिंदे यांचं भाजपच्या (BJP) पाठिंब्यावर सरकार आहे.
आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारकडून सीबीआयला तपसाचे अधिकार दिले जाणार आहेत, अशी माहिती आहे.
राज्य सरकार येणाऱ्या काही दिवसांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) हा निर्णय घेतला जाणार आहे,
अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

Web Title :- Eknath Shinde Government | eknath shinde devendra fadnavis government will change uddhav thackeray government decision cbi investigation in state

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 Ajit Pawar | शिंदे सरकारवर नामुष्की? मंत्री अजित पवारांच्या प्रश्नाला उत्तर देण्यात असमर्थ

 

Ajit Pawar | ‘थांबा, तुम्ही 40 आमदार कुठं जाणार नाहीत, ते वरचे 10 असे तसेच’ अजित पवारांची सभागृहात फटकेबाजी

 

Pune Crime | कारागृहातून सुटलेल्या आरोपीने कारागृहातील महिला रक्षकालाच घातला गंडा