Eknath Shinde Government | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात पुणे शहर आणि जिल्ह्याला किती मंत्रीपदे?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde Government | राज्यात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार (BJP Government) आले असून मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विराजमान झाले आहेत. आता मंत्रिमंडळात कुणा-कुणाची वर्णी लागणार आणि भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी कोण-कोणत्या जिल्ह्यांना मंत्रिपदे मिळणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये मुंबईनंतर (Mumbai) प्रामुख्याने पुणे जिल्ह्याचा विचार केला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या पुणे जिल्ह्यासह पुणे शहरात राजकीय पकड मजबुत करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार पुण्याला किती मंत्रिपदे देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Eknath Shinde Government)

 

शिंदे आणि फडणवीस मंत्रिमंडळात पुणे (Pune), पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि जिल्ह्यातील किती आमदारांना मंत्रीपदे मिळणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड (Kothrud) विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद निश्चित मानले जात आहे. त्याचबरोबरच माधुरी मिसाळ (Madhuri Misal) आणि भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir), सुनील कांबळे (Sunil Kamble) यांची नावेही मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. पिंपरी-चिंचवडमधून आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) तर जिल्ह्यातून राहुल कुल (Rahul Kul) यांना संधी मिळू शकते. (Eknath Shinde Government)

 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांची निवडणूक जवळ आल्याने या शहरांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. अनेकजण मंत्रिपदासाठी उत्सुक असले तर भाजपाच्या धक्कातंत्रामुळे सध्या तरी विविध अंदाज वर्तवले जात आहे. जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघामध्ये 12 मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार आहेत. तर उर्वरीत नऊ मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. शिवसेनेचा एकही आमदार जिल्ह्यात नाही.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार, शिक्षण संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच वर्चस्व असल्याने राष्ट्रवादी आगामी काळात शह देण्यासाठी आणि आपला प्रभाव वाढवण्यासाठी पुणे जिल्ह्यात जास्त मंत्रीपदे भाजपाला द्यावी लागणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना टक्कर देणारा नेता म्हणून जिल्ह्यातून कुणाला मंत्रीपद देण्यात येईल हे आगामी काळात ठरणार आहे.

 

या दिग्गजांपैकी कुणाला मिळणार मंत्रिपद

कोथरूड मतदारसंघाचे भाजपा आमदार चंद्रकांत पाटील

पर्वती विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ.

खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर.

पिंपरीचे आमदार महेश लांडगे

दौंडचे आमदार राहुल कुल

शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे.

सुनील कांबळे यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो.

 

मंत्री होण्याच्या भाजपमधील अनेक इच्छुकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
महेश लांडगे यांच्या नावाची चर्चा असतानाच महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे (Uma Khapre) यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे.
परंतु, मंत्रीपदाऐवजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर खापरे यांची वर्णी लागू शकते, असे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात येते आहे.

 

Web Title :- Eknath Shinde Government | how many ministerial posts does pune district have in shinde fadnavis cabinet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Goa Police Arrested NCP Student Leader Sonia Duhan | राष्ट्रवादीच्या तीन पदाधिकार्‍यांना अटक; सेना आमदारांशी संपर्क?

 

CM Eknath Shinde | राजकीय क्षेत्रात खळबळ ! CM एकनाथ शिंदेंच्या PA कडून धमकीचा फोन?,

 

Aditya Thackeray On Shivsena Rebel MLA | शिवसेनेचे बंडखोर आमदार विधान भवनात दाखल होताच आदित्य ठाकरे म्हणाले – ‘कसाबलाही असं आणलं नसेल’