Eknath Shinde Group | गुलाबराव पाटलांनी जळगाव जिल्ह्यातील शिवसेना संपवली, शिंदे गटातील आमदाराचा खळबळजनक आरोप; शिंदे गटात अंतर्गत धुसफुस ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत (Shivsena) बंड केल्यानंतर मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला (Eknath Shinde Group) राज्यातील शिवसैनिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. परंतु अशातच एकनाथ शिंदे गटामध्ये (Eknath Shinde Group) थोडीफार अंतर्गत धुसफुस असल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगावातील शिवसेनेचे बंडखोर आमदार चिमणराव पाटील (Shivsena Rebel MLA Chimanrao Patil) आणि एका शिवसैनिकामध्ये फोनवर झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल (Audio Clip Viral) झाली आहे. या क्लीपमध्ये चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर सडकून टीका केली आहे.

 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंत्रीपद देऊनही गुलाबराव पाटील हे एकनाथ शिंदे गटात (Eknath Shinde Group) कसे सामील झाले हे माहित नाही. पण गुलाबराव पाटील यांनी 10 जन्म घेतले तरी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर केलेल्या उपकारांची परतफेड करता येणार नाही, असे चिमणराव पाटील यांनी म्हटले आहे. यामुळे आता भाजपसोबत (BJP) सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे गटात अंतर्गत वाद रंगण्याची शक्यता आहे.

 

जळगाव जिल्ह्यातील शिवसेना संपवली

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमधील संभाषण अतिशय धक्कादायक आहे. गुलाबराव पाटील यांनीच जळगाव जिल्ह्यातील शिवसेना संपवली, असा गंभीर आरोप चिमणराव पाटील यांनी केला आहे. गुलाबराव पाटील यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. मी शिवसेनेतून कसा बाहेर जाईल, यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. मी भिकाऱ्यासारखे पक्षश्रेष्ठींच्या पाठीशी फिरलो, पण पदरी निराशाच पडली. मला अनेकदा दाद मागूनही न्याय मिळत नव्हता. त्यामुळे मी एकनाथ शिंदे गटासोबत गेल्याचे चिमणराव पाटील यांनी म्हटले आहे.

 

त्यांच्या जाचाला कंटाळून बाहेर पडलो

गुलाबराव पाटील यांनी माझ्यावर खूप अन्याय केला. मी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला होता.
मी 29 वर्षे शिवसेनेत आहे, या काळात माझ्याकडून एकतरी चूक झाली का, असा सवालही मी उद्धव ठाकरे यांना विचारला होता.
परंतु त्यानंतरही गुलाबराव पाटील यांनी माझ्यावर अन्याय करणं सुरुच ठेवलं. मी खूप वाईट गोष्टी सहन केल्या.
गुलाबराव माझ्याविरोधात पोलिसांना फोन करायचे. त्यांच्या जाचाला कंटाळूनच मी बाहेर पडलो, असे चिमणराव पाटील यांनी म्हटले.

 

असं होईल वाटलं नव्हतं

आता गुलाबराव पाटील हे देखील शिंदे गटात गेले, मग तुमचं कसं होणार, असा प्रश्न शिवसैनिकाने चिमणराव पाटील यांना विचारला.
यावर ते म्हणाले, आपल्याला काय माहिती, ज्या माणसाला एवढं मंत्री केलं तो फुटेल, असं मला वाटत नव्हतं.
गुलाबरावांनी 10 जन्म घेतले तरी उद्धवसाहेबांनी केलेले उपकार फिटणार नाहीत, असे चिमणराव पाटील म्हणाले.

 

Web Title :- Eknath Shinde Group | eknath shinde camp rebel shivsena mla chimanrao patil salms gulabrao patil for leaving uddhav thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा