Eknath Shinde Group Supreme Court | बंडखोर एकनाथ शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात ठाकरे सरकारविरोधात 2 याचिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Eknath Shinde Group Supreme Court | राज्यातील शिवसेनेत (Shivsena) सुरू झालेल्या बंडखोरीचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचला आहे. बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सूरतमधून सुरू केलेले बंड गुवाहटीमार्गे आता दिल्लीत पोहचले आहे. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या निलंबन नोटीस (Suspension Notice) बजावली असून त्याविरोधात एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयाचा (Eknath Shinde Group Supreme Court) दरवाजा ठोठावला आहे. शिंदे यांनी याविरोधात दोन याचिका दाखल केल्या आहेत.

 

एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी तातडीची बैठक घेण्यासाठी व्हीप बजावला होता. या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या बंडखोरांचे निलंबन करावे अशी मागणी शिवसेनेने उपसभापतींकडे केली होती. त्यानंतर उपसभापती नरहरी झिरवळ यांनी 16 बंडखोर आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने मोठा कायदेशीर पेच शिंदे गटासमोर निर्माण झाला होता.

 

आता शिंदे गटाने बंडखोर आमदारांविरोधातील या अपात्रतेच्या कारवाईला आव्हान दिले आहे. याचबरोबर विधानसभेत शिंदे यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही आमदाराला शिवसेना गटनेते पदी नियुक्ती किंवा प्रतोद बनविण्यावर आव्हान दिले आहे. यामध्ये विधानसभा उपाध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रात अतिक्रमण करण्यात आल्याचा मुद्दा समोर आणण्यात आला आहे.

शिंदे गटाने या याचिकेची प्रतही राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) पाठविल्याचे समजते. यामुळे कोर्टाकडून (Eknath Shinde Group Supreme Court) जारी होणार्‍या नोटीसीचा वेळ वाचू शकेल. या याचिकांवर तात्काळ म्हणजेच उद्या सकाळी साडेदहाला सुनावणी होऊ शकते.

 

शिवसेनेने बंडखोर आमदारांना सोमवारी सायंकाळपर्यंत मुदत दिली आहे. यामुळे बंडखोर आमदारांनी आपल्यावरील कारवाई ही नियमबाह्य असल्याचे म्हटले आहे. सात दिवसांचा कालावधी देण्याचे नियमात असताना 48 तासांची मुदत दिल्याचे यात म्हटले आहे.

 

विधानसभेमध्ये नोंद नसलेल्या मेल आयडीवरून ठाकरे सरकारविरोधात (Thackeray Government)
अविश्वास प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे कारण देत हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचेही या याचिकांमध्ये म्हटले आहे.

 

शिवसेनेच्या वकिलांनी म्हटले…

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात संविधानाच्या अनुच्छेद 2(1) मधील 10 व्या परिच्छेदानुसार नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
कामत यांनी दावा केला की, हे बंडखोर आमदार भाजपाच्या (BJP) राज्यांत थांबले आहेत.
त्यांनी भाजपाच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. शिवसेनेविरोधात अनेक पत्रे लिहीली आहेत. हे शिवसेना सोडल्याचे पुरावे आहेत.

 

कामत यांनी म्हटले की, शिवसेनेने बोलविलेल्या एकाही बैठकीला हे आमदार उपस्थित राहिलेले नाहीत.
विधानसभेत असुदे की बाहेर कुठेही पक्षविरोधी कारवाई केली तरी आमदारकी, खासदारकी रद्द होते.
रवी नायक खटला, कर्नाटक खटल्यात काय झाले?
शरद यादव यांनी लालू प्रसादांच्या सभेला हजेरी लावली म्हणून त्यांना खासदारकी गमवावी लागली होती.

 

Web Title :- Eknath Shinde Group Supreme Court | Shivsena eknath shinde group in the
supreme court agianst shivsena mlas disqualification notice two petitions against uddhav thackeray government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा