Eknath Shinde Group Vs Shivsena Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा नाही तर टोमणे सभा, शिवाजी पार्कवर शिवसेनेला परवानगी मिळाल्याने नाराज शिंदे गटाने उडवली खिल्ली

मुंबई : Eknath Shinde Group Vs Shivsena Uddhav Thackeray | अखेर शिवसेनेला मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली आहे. मुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिका प्रशासानाला चपराक देत शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्याला ही परवागनी दिली. शिवसेनेला या ठिकाणी परवानगी मिळू नये यासाठी प्रयत्नशील असलेल्या शिंदे गट आणि भाजपाची नाराजी यानंतर टीकेच्या माध्यमातून उघड होऊ लागली आहे. शिवसेनेला शिवाजी पार्कवर परवानगी मिळाल्याने शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Eknath Shinde Group Vs Shivsena Uddhav Thackeray)

नरेश म्हस्के यांनी म्हटले की, दसरा मेळावा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केला. त्यांची टॅगलाईन होती हिंदुत्ववादी विचारांचे सोने लुटण्यासाठी या. मात्र, आता ज्यांना परवानगी मिळाली त्याठिकाणी हिंदुत्ववादी विचार ऐकायला मिळणार नाहीत. तर टोमणे ऐकायला मिळतील. गद्दार, वज्रमूठ, खोके, बेईमानी हेच शब्द असतील. ही टोमणे सभा असेल. खरे हिंदुत्ववादी विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत ऐकायला मिळतील. (Eknath Shinde Group Vs Shivsena Uddhav Thackeray)

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केल्याने आपली नाराजी व्यक्त करताना नरेश म्हस्के म्हणाले, छगन भुजबळांनी (Chaggan Bhujbal) जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा कुठल्या भाषेत टीका केली होती. टी बाळू असा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांना शिवसेनेची बाजू घेण्याचा काय अधिकार आहे. छगन भुजबळांना स्मृतीभंश झाला आहे. बाळासाहेबांना त्रास देणारा माणूस हा छगन भुजबळ आहे. जे शिवसैनिक फटाके फोडतायेत त्यांचे भुजबळांबाबत काय मत आहे हे विचारा.

म्हस्के म्हणाले, आमची सभा मुंबईतच होणार, राज्यभरात सभा होत आहेत. प्रचंड गर्दी सभांना होत आहे.
राज्यातील बहुतांश पदाधिकारी एकनाथ शिंदेंसोबत आहेत. एकनाथ शिंदेंच्या सभेत हिंदुत्ववादी विचार ऐकायला मिळतील.
उद्धव ठाकरेंच्या सभेत टोमणे ऐकायला मिळतील. मोठ्या उत्साहात, जल्लोषात मुंबईतच सभा होणार आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे असा वाद नाही. हा वाद बाळासाहेबांचे विचार, तत्व आणि खुर्चीसाठी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांच्यासोबतचा हा वाद आहे.

शिवतीर्थावर परवानगी मिळाल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले…

कार्यकर्त्यांनी वाजत गाजत यावे परंतु दसरा मेळाव्याला गालबोट लागेल असे वागू नये.
माझ्या बहिण, भावांनो आपल्या परंपरेला पुढे न्यायचे आहे म्हणून शिस्तीने वागावे.
आपल्यावर कोणी बोट दाखविण्याची हिंमत करू नये.
सर्वोच्च न्यायालय शिवसेनेच्या वादावर जो निकाल देईल तो देशाच्या लोकशाहीचे भविष्य ठरविणारा निकाल असेल.
न्यायदेवतेवर मी संशय घेतलेला नाही. आज लोकशाहीच्या विजयाचा दिवस आहे.
न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Web Title :-  Eknath Shinde Group Vs Shivsena Uddhav Thackeray | shinde group spokesperson naresh mhaske target uddhav thackeray over dussehra melava

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IND Vs AUS T-20 | दिनेश कार्तिकनं जिंकूण देताच रोहित शर्मा आनंदानं…

Moto Vault | मोटो व्हॉल्टच्या  पहिल्या शोरूमचे पुणे येथे उद्घाटन