Eknath Shinde Group Vs Uddhav Thackeray | टक्केवारीमुळे वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गेला, माझ्याकडे पुरावे; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप

मुंबई : Eknath Shinde Group Vs Uddhav Thackeray | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) आला कधी? एखादी कंपनी स्थापन करायची असेल, तर कंपनीचा मालक वर्षभरापासून नियोजन करत असतो. तो यांना भेटला असेलच. शिंदे गट-भाजपाचे सरकार येऊन दोन महिने झाले. दोन महिन्यांपूर्वी कंपनीकडून सर्व प्रक्रिया केली असेल. टक्केवारीमुळे हा प्रकल्प इथून गेला. आधीच्या राज्यकर्त्यांची डील झाली नाही, म्हणून हा प्रकल्प इथून गेला. त्याचे पुरावेही मी जाहीर करणार आहे, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी केला आहे. (Eknath Shinde Group Vs Uddhav Thackeray )

संजय शिरसाट यांनी आधीच्या सरकारच्या विरोधात काही पुरावे हाती लागल्याचा दावा करत म्हटले की, हा प्रकल्प जाऊच नये, या मताचे आम्हीही होतो. हा प्रकल्प दोन महिन्यांच्या कालावधीत गेलेला नाही. यांनी त्यांच्या फायद्याचे गणित बघितले. कंपनीवाला तुमच्यासाठी कंपनी टाकत नाही. तो त्याच्या फायद्यासाठी कंपनी टाकत असतो.

प्रत्येक गोष्टीत डीलिंग झाल्याचे समोर येत आहे. आता ते ज्या बोंबा मारत आहेत, त्यावर आम्ही पुरावे समोर मांडू.
आमच्या हाती काही पुरावे लागले आहेत. त्यांचे खोके, धोके असे सगळे सध्या चालले आहे.
5 तारखेला आमच्या दसरा मेळाव्यात शिंदे त्याचे उत्तर देतील. (Eknath Shinde Group Vs Uddhav Thackeray)

नाराजीच्या वृत्तावर स्पष्टीकरण देताना शिरसाट म्हणाले, माझ्या नाराजीच्या बातम्या दरवेळी येतात आणि मला त्याचा त्रास होतो. मी एकनाथ शिंदे यांनाही याबाबत भेटलो.
या अफवा थांबवा, नाहीतर मला मानहानीचा दावा दाखल करावा लागेल.
एकनाथ शिंदेंसोबत आम्ही काही मिळवण्यासाठी गेलो नाही.
मंत्रीपद, उपनेतेपद या अपेक्षेने गेलो नाही, तर एका वेगळ्या ध्येयाने गेलो आहे.

शिरसाट म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यावर आम्ही जेव्हा विश्वास ठेवला, तेव्हा हा विचार केला नाही की आमचे काय होईल.
आम्ही हा विचार केला की एकनाथ शिंदे महाराष्ट्राला आणि शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन जातील.
मी आजही एकनाथ शिंदेंसोबत आहे, उद्याही आहे आणि परवाही राहणार आहे.

Web Title :- Eknath Shinde Group Vs Uddhav Thackeray | cm eknath shinde group mla sanjay shirsat on vedanta foxcon project politics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Diabetes Diet Tips | 3 असे नट्स, ज्यांचे डायबिटीज रूग्णांनी आवश्यक केले पाहिजे सेवन

Shisvena Uddhav Thackeray – Raj Thackeray | धोका लक्षात घ्या, ते ‘इंजिन आणि डबे’ गुजरातला वळवतील, उद्धव ठाकरे यांनी भाजपाबाबत राज ठाकरे यांना दिला सूचक इशारा

Vedanta Foxconn Project | वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पावरून अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना इशारा; म्हणाले – ‘तो प्रकल्प परत आणा…’

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांची भाजप महाराष्ट्रच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती