अलिबाग : Eknath Shinde Group Vs Uddhav Thackeray | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जाहीर सभेत भाजपा आणि शिंदे गटाचा जोरदार समाचार घेतल्याने भाजपा आणि शिंदे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर कालपासून चारही बाजूने तुटून पडले आहेत. नारायण राणे (BJP Leader And Union Minister Narayan Rane) यांनी तर ठाकरे यांना ED ची चौकशी लावून अटक करण्याची धमकी दिली होती. आज राज्याचे बंदरे, मत्स्य विकास मंत्री दादा भुसे (Eknath Shinde Group Minister Dada Bhuse) यांनीही शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा फोटो आम्ही काढू पण…, असे म्हणत ठाकरे यांना आव्हान दिले आहे. ते अलिबागमध्ये बोलत होते. (Eknath Shinde Group Vs Uddhav Thackeray)
शिंदे गटाची रायगड जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठक गुरुवारी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या निवासस्थानी झाली. दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी ही बैठक होती. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान देताना म्हटले की, बाळासाहेब ठाकरे हे एका व्यक्तीचे बाप नाहीत ते समस्त शिवसैनिकांचे बाप आहेत. बाळासाहेब हे राष्ट्रपुरुष असल्याचे जाहीर केले आहे. शिवसैनिकांच्या बापाला कमी लेखू नका. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढतो, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो काढून जनतेच्या दरबारात जा. (Eknath Shinde Group Vs Uddhav Thackeray)
यावेळी भुसे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले की, मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांना भेटले नाहीत आणि आता प्रत्येकाला भेटत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अडीच महिन्यांपासून काम करीत आहेत. तसे काम अद्याप एकाही मुख्यमंत्र्याने केलेले नाही.
भुसे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख हे आपल्या भाषणात शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांवर गद्दार,
तसेच बाप पळविल्याची टीका करीत आहेत. शिंदे आणि भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर जनतेसाठी विविध हितकारी निर्णय घेतले आहेत. ते कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावे.
भुसे म्हणाले, आमदारांनी उठाव केला तेव्हा आम्ही घरातील भांडण मिटावे यासाठी प्रयत्न करत होतो.
त्यावेळी उद्धव ठाकरे यांची मानसिकता आमदारांच्या बाजूने बदलत होती.
मात्र संजय राऊत, भास्कर जाधव येऊन ठाकरे यांचे विचार बदलत होते.
अडीच वर्ष घरात बसून काहीही काम केले नाही. निर्णय घेण्याबाबत आम्ही उद्धव यांना सांगत होतो.
मात्र अजित पवार हे खोडा घालण्याचे काम करीत असल्याने आमची अडचण झाली.
Web Title :- Eknath Shinde Group Vs Uddhav Thackeray | you take a picture of shivaji maharaj we take a picture of balasaheb dada bhuse on uddhav thackeray
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Accident News | धक्कादायक! ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून 6 महिन्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
Maharashtra Cabinet Expansion | दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला पाहिजेत ‘ही’ खाती
Babar Azam-Virat Kohli | बाबर आझमने रिझवानसोबत रचला इतिहास, विराट कोहलीला टाकले मागे
वेदांता-फॉक्सकॉननंतर आता PhonePe देखील महाराष्ट्र सोडणार