Eknath Shinde | रॅडिसनबाहेरुन एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले – ‘लवकरच मुंबईत परतणार..’

गुवाहाटी : वृत्तसंस्था – Eknath Shinde | शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde) आणि शिवसेना आमदारांच्या बंडाचा आज आठवा दिवस आहे. कालच सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) बंडखोर आमदारांना दिलासा दिल्याने शिंदे गटात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जवळपास आठ दिवसानंतर एकनाथ शिंदे रॅडिसनबाहेर गेटपर्यंत आले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

 

रॅडिसनबाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “आमच्या भूमिकेची माहिती आमचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) वेळोवेळी देत आहेत.
आम्ही शिवसेनेत आहोत. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची शिवसेना पुढे घेऊन जातोय.
इथले आमदार आनंदात आहेत. आमदार संपर्कात असल्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेने नावं जाहीर करावीत,” असं शिंदे यांनी सांगितलं.

 

तसेच, लवकरच मुंबईत परतणार असल्याचं म्हणत 50 आमदार स्वता:च्या मर्जीनं आले आहेत.
आपण निश्चित राहा, काळजी करु नका,” असं देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

 

Web Title :- Eknath Shinde | maharashtra political crisis eknath shinde and mla in assam guwahati hotel cm uddhav thackrey ncp leader sharad pawar mahavikas aghadi bjp

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा