Eknath Shinde | याचा अर्थ काय? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल; दुटप्पी भूमिकेवरुन सडेतोड पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसैनिकांनो, परत फिरा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केलेलं आवाहन बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी फेटाळलं आहे. हे आवाहन फेटाळताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे. एका बाजूने शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, कुत्रे, मृतदेह म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने हिंदूविरोधी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) वाचवण्यासाठी समेटाची हाक द्यायची याचा अर्थ काय असा सवाल एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

 

एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी बंडखोरी केल्यापासून संजय राऊत आणि आदित्य ठाकरे सातत्याने त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे गटावर सातत्याने टीका केली. तर संजय राऊत यांनीही आक्षेपार्ह भाषेत शिंदे गटावर हल्लाबोल करत आहेत. शिंदे गटाकडून यावर आक्षेप घेण्यात आला आहे. मात्र पहिल्यांदाच खुद्द एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले असून, उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.

 

काय म्हणाले एकनाथ शिंदे?
एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआ सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसेच यावेळी #donttrickmaharashtra असा नवा हॅशटॅगही वापरला आहे.

 

Web Title :- Eknath Shinde | maharashtra political crisis eknath shinde slams shivsena uddhav thackeray new tweet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau (ACB) Thane | 7 हजाराची लाच घेताना तालुका कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

 

Mukesh Ambani News | मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओचा दिला राजीनामा, आकाश अंबानी बनले कंपनीचे चेअरमन

 

Maharashtra Political Crisis | “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील..! ‘एकनाथ शिंदे आमदार शहाजीबापूंना म्हणाले ‘Once More’