Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणूक कधी होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 | When will the assembly elections in the state? Signals of Chief Minister Eknath Shinde
File Photo
ADV

चांदीवली: Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलेली आहे. दरम्यान निवडणुका नेमक्या कधी जाहीर होणार याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत. मात्र आता या चर्चेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे.

चांदीवली येथील मिठी नदी शेजारील व विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील क्रांतीनगर व संदेश नगर येथील प्रकल्प बाधित झोपडपट्टीधारकांचे एचडीएल संकुल, कुर्ला येथे बांधलेल्या इमारतीत पुनर्वसनासाठी दिलेल्या सदनिकेच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणुकीबाबत भाष्य केले.(Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024)

येत्या दोन महिन्यानंतर म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणुका होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
तसेच, यावेळी चांदिवली विधानसभा मतदारसंघातून दिलीप लांडे यांना निवडून देण्याचे आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी केले.

याचबरोबर, मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन व इतर पुनर्वसन प्रकल्प रखडल्यामुळे मुंबईकर मुंबई बाहेर गेला आहे.
त्यांना परत मुंबईत आणण्यासाठी रखडलेले प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत.
त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला चालना देण्यात आली असून हे प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे
उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

हे देखील वाचा

PMC Property Tax Department | मिळकत कर विभागातून बदली झालेल्या 20 टक्के निरीक्षकांना पुन्हा त्याच विभागात संधी !

Pune Crime News | सुधीर गवस खुनाचा बदला घेण्यासाठी खूनाचा प्रयत्न करुन फरार झालेला गुंड जेरबंद (Video)

Gultekdi Pune Crime News | पुणे : गुलटेकडीमध्ये मध्यरात्री तरुणावर वार करुन निर्घुण खुन; भावाला वाचवायला गेला आणि जीव गमावला, 5 जणांना अटक

Total
0
Shares
Related Posts