Eknath Shinde On Sharad Pawar | एकनाथ शिंदेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘महाराष्ट्रात यायला आम्ही थोडीच घाबरतो’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde On Sharad Pawar | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. त्यामुळे नेमका तोडगा कोणता निघणार यावर राज्यभर चर्चा होताना दिसत आहे. माध्यमांशी बोलताना बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात यावेच लागेल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केलं होतं. यामुळे आता शरद पवार अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसते. यानंतर बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनीही शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

 

एकनाथ शिंदे म्हणाले, “विधानमंडळाच्या नियमानुसार ज्या बाबी करायच्या त्या कराव्याच लागतील. त्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. महाराष्ट्रात यायला आम्ही थोडीच घाबरतो,” असं ते म्हणाले.

पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, “पवार हे देशातील मोठे नेते आहेत. त्यांचा आम्ही आदरच करतो, पण, लोकशाहीत संख्याबळ महत्त्वाचे असते. कायद्यानुसार जे काही असते तसेच करावे लागते. नियमाप्रमाणे आमची बाजू भक्कम आहे. सध्या आमच्याकडे चाळीस पेक्षा अधिक आमदार आहेत तर 10 अपक्षांचाही पाठिंबा आहे. आमदारांच्या बैठकीनंतर आम्ही पुढील गोष्टी ठरवू.”

दरम्यान, “सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबी आता पूर्ण झाल्या आहेत. आमदारांच्या बैठकीनंतर निर्णय घेऊ,”
असं शिंदे यांनी सांगितलं आहे. तसेच, शिवसेनेकडून आमदारांच्या निलंबनाची मागणी केली जात आहे.
अल्पमतात असलेल्या गटाला असे निर्णय घेता येत नाहीत.
याशिवाय बैठकीला अनुपस्थित राहिल्याने आमदारकी रद्द केली तर ती देशातील पहिली घटना ठरेल.
त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe)
यांची महाशक्ती आपल्या पाठीमागे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

Web Title :- Eknath Shinde On Sharad Pawar | we are not afraid to come to maharashtra said eknath shinde to ncp chief sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Airtel 365 Days Plan | एक वर्षाच्या व्हॅलिडिटीचा सर्वात स्वस्त प्लान, मिळतील अनलिमिटेड कॉल्स, जाणून घ्या किंमत

 

Pune Crime | तोतया अँटी करप्शनची रेड पोलिसांच्या दक्षतेने टळली; पोलिसांना पाहून बनावट पोलिसांनी ठोकली धुम

 

Cryptocurrency Market | क्रिप्टोकरन्सी मार्केट मागील 3 दिवसांपासून पॉझिटिव्ह, लागोपाठ वाढत आहे इथेरियमचा डॉमिनन्स