Eknath Shinde Revolt | ‘स्वाभिमानाने जगू, पण शरणार्थी म्हणून नाही’, शिवसेनेच्या बड्या नेत्याचे सूचक वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde Revolt | शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shivsena Leader Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. एकनाथ शिंदे आपल्यासोबत 35-40 आमदारांना (MLA) घेऊन गेले आहेत. शिंदे यांच्या बंडामुळे (Eknath Shinde Revolt) राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) अल्पमतात जाण्याची शक्यता आहे. यातच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यातील राजकीय प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने आहे, असे ट्विट केले होते. यावर आता शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने प्रतिक्रिया दिली असून सूचक वक्तव्य केलं आहे.

 

‘आम्ही स्वाभिमान गहान ठेवलेला नाही. राखेतून पुन्हा उभे राहू’, असे सूचक विधान शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Shivsena MP Arvind Sawant) यांनी केले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी सावंत म्हणाले की, नार्वेकरांना (Milind Narvekar) एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी किती वेळ लागला, सरकार कोसळणार का याची कल्पना नाही. आम्ही कधीच सत्तेची पर्वा केलेली नाही. स्वाभिमानाने जगू, पण शरणार्थी म्हणून नाही, असं सावंत यांनी म्हटले. (Eknath Shinde Revolt)

अरविंद सावंत पुढे म्हणाले, आम्ही कधीच स्वाभिमान गहाण ठेवलेला नाही.
मुठभर मावळे घेऊन जगू, पुन्हा राखेतून उभे राहू.
जनता दलापासून हे होत आलं आहे. राज ठाकरे (Raj Thackeray), नारायण राणे (Narayan Rane) जेव्हा गेले तेव्हादेखील राजकीय भूकंप असे शब्द वापरले होते.
मात्र, शिवसेना पुन्हा उभी राहिली. मुळात शिवसेना ही आमदारांमुळे नाही, शिवसैनिकांमुळे आहे.
उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) बैठक घेणार आहेत. त्यात पुढील दिशा ठरेल, असेही सावंत यांनी सांगितले.

 

Web Title :-  Eknath Shinde Revolt | we will live with self respect will rise from the ashes again says shiv sena leader arvind sawant maharashtra political crisis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा