Eknath Shinde | विधीमंडळ पक्षप्रमुखपदी एकनाथ शिंदेच कायम; 34 आमदारांचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पत्र?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde | दोन दिवसांपासून सुरु असलेल्या राज्यातील घडामोडींवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाष्य केल्यानंतर राज्याच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या मतांवर ठाम असल्याचे बोलले जाते. भाजपसोबत (BJP) युती करा, या मागणीवर शिंदे ठाम आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. यानंतर एकनाथ शिंदेच विधिमंडळ पक्षप्रमुखपदी कायम असतील, असा ठराव शिवसेनेच्या बंडखोर आमदारांकडून केला आहे. याबाबतचे पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना पाठवण्यात आलं आहे असे सांगण्यात येत आहे.

 

शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या मुख्य व्हिपपदी सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची निवड करण्यात आली आहे. ती निवड तात्काळ रद्द करून त्या जागी भरत गोगोवले (Bharat Gogovale) यांची नियुक्ती करावी, अशी मागणी बंडखोर आमदारांनी केली. शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या मुख्य व्हिपपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केली. याबाबत माहिती काल एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या ट्विटरवरुन दिली. तसेच विधीमंडळ पक्षाच्या बैठकीबाबत सुनील प्रभू यांनी दिलेला आदेश बेकायदेशीर असल्याचं शिंदे यांनी त्यात नमुद केलं आहे. त्यानंतर त्यांनी प्रभू यांची विधिमंडळ पक्षनेते पदावरून हकालपट्टी केली.

दरम्यान, 2019 मध्ये एकनाथ शिंदे यांची एकमताने विधिमंडळ पक्षप्रमुख पदी निवड करण्यात आली होती आणि ते यापुढे देखील विधिमंडळ पक्षप्रमुख राहतील. असा ठराव पारित केला गेला. त्याचबरोबर 34 आमदारांचे पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठविले आहे. यावरून एकनाथ शिंदे हेच विधीमंडळ पक्ष प्रमुखपदी कायम असल्याचं बंडखोर आमदारांकडून सांगण्यात आलं आहे.

 

Web Title :- Eknath Shinde | shivsena leader eknath shinde continues to
be legislative party chief of shivsena rebel mlas write alatter to maharashtra governor

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा