Eknath Shinde | ‘राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचं संरक्षण काढलं’; एकनाथ शिंदेंचा थेट आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde | आघाडी सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यात अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे राज्यात सत्ता संघर्ष पाहायला मिळतोय. त्यामुळे शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गट यांच्यात संघर्ष वाढताना दिसत आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्यामार्फत अपात्र का करू नये याबाबत म्हणणं मांडण्याचं पत्र शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पाठवले जाणार आहे. त्यांना अपात्र करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आलीय. यानंतर आता शिंदे गट आक्रमक झाल्याचे दिसते.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कायद्याचा दाखला देत एक ट्विट केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिलं आहे. “राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे’,” असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ (DGP Rajneesh Seth) यांना पाठवलं आहे.

दरम्यान, या आमदारांच्या कुटुंबीयांना धमकावण्याचा प्रयत्न होत आहे.
या आमदारांच्या कुटुंबीयांना काही झाल्यास त्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार (Sharad Pawar),
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) जबाबदार असतील, असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Eknath Shinde | shivsena leader eknath shinde tweet on shivsena mla cm uddhav thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा