Eknath Shinde | मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार एकनाथ शिंदेंकडे सोपवला? शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे सोपविण्यात (handed over charge chief minister) आल्याचे वृत्त सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहे. मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) बुधवारी एच.एन. रिलायन्स रुग्णालयात (H.N. Reliance Hospital) दाखल झाले असून उद्या म्हणजे शुक्रवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे सोपवल्याचे वृत्त फिरत आहे. यावर एनकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

 

एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियातून
(social media) व्हायरल (Viral) होत असून यामध्ये कोणतेही तथ्य नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया (Surgery) करण्यात येणार असून,
त्यानंतर अवघेत तीन ते चार दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील.
त्यामुळे समाजमाध्यमावर फिरणाऱ्या खोट्या आणि खोडसाळ मेसेजेस, पोस्टवर विश्वास ठेवू नये.
असे आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.

 

काय म्हणाले मुख्यमंत्री?

 

मागील दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करत आहोत.
एकीकडे या विषाणूशी लढाई सुरु असताना दुसरीकडे आपलं जीवनचक्र सुरु रहावं.
राज्यातील विकास कामं सुरुच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय.
मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हती, सहाजिकतच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच.
अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या त्रासाबद्दल सांगितलं होतं.

 

Web Title : Eknath Shinde | shivsena minister eknath shinde handed over charge chief minister know truth behind viral message eknath shinde said

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nawab Malik | ‘होय, मुख्यमंत्र्यांनी माझी प्रशंसा केली, शरद पवार माझ्या पाठिशी’ – नवाब मलिक

Crime News | योगी सरकारमधील अधिकाऱ्याची महिला कर्मचाऱ्यावर शारीरिक बळजबरी; लैंगिक शोषण करतानाचा Video Viral

Chandrakant Patil | ‘नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्यांची NIA चौकशी व्हावी’ – चंद्रकांत पाटील 

Mallika Sherawat | मल्लिका शेरावतच्या कमरेवर प्रोड्यूसरला शेकायची होती चपाती, सांगितला ’हॉट साँग’चा किस्सा