Eknath Shinde | ‘MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे’, एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर राज्यातील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली. बंडखोर आमदारांच्या (Rebel MLA) कार्यालयावर संतप्त शिवसैनिकांनी हल्ला करुन कार्यालयाची तोडफोड केली. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही वेळापूर्वी ट्विट करुन संतप्त शिवसैनिकांना आवाहन केले आहे. MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठी मी लढत आहे, अशा शब्दांत शिवसैनिकांना आवाहन करुन महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) निशाणा साधला आहे.

 

राज्यात शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर हल्ले होत आहे. शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन शिवसैनिकांना आवाहन केले आहे. शिंदे म्हणतात, ‘प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजू घ्या, म.वि.आ.चा खेळ ओळखा..! MVA च्या अजगाराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित… आपला एकनाथ संभाजी शिंदे’, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे.

 

दरम्यान, शिवसेनेत बंड झाल्यानंतर आता हे बंड मोडून काढण्यास सुरुवात झाली आहे.
शिवसेनेने 16 आमदारांना अपात्र (Ineligible) ठरवण्याची मागणी केली होती.
त्यासाठीचा अर्ज विधानसभा उपाध्यक्षांना देण्यात आला होता. त्यानंतर आज विधानसभा उपाध्यक्षांनी 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे.
या आमदारांना आता सोमवारी 27 जून पर्यंत 5.30 वाजेपर्यंत नोटिशीला उत्तर द्यावे लागणार आहे.
या कालावधीत नोटिसीला उत्तर दिले नाही तर या नोटिसीवर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Political Crisis)

 

 

Web Title :- Eknath Shinde | shivsena rebel leader eknath shinde warns shivsainik and said understand this maha vikas aghadi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aaditya Thackeray | ‘घाण निघून गेली, आता जे काही होणार चांगलंच होणार’; आदित्य ठाकरेंची बंडखोर आमदारांवर खोचक शब्दात टीका

 

Pune MSEDCL | पुण्यातील लोणीकंद, वाघोली, मांजरीसह ‘या’ परिसरात रविवारी वीजपुरवठा बंद राहणार

 

Jio Prepaid Recharge Plan | Jio ने आणला 155 रुपयांचा जबरदस्त रिचार्ज, 1 महिन्यापर्यंत फ्रीमध्ये होईल Calling आणि मिळेल Data