Eknath Shinde | पोलिसांचा सण झाला गोड ! पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना भरवला ‘फराळ’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन –  प्रत्येक सणाला पोलीस आपले कर्तव्य करत रस्त्यावर दक्ष असतात म्हणून आपण आनंदाने आणि सुखाने दिवाळी साजरी करु शकतो, वाहतूक पोलिसांच्या या कर्तव्यभावनेची जाण राखून नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज ठाणे शहर वाहतूक पोलिसासोबत (Thane City Traffic Police) दिवाळी साजरी (celebrat diwali) केली. एवढेच नाहीतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिवाळीचा फराळ देखील भरवला.

 

ठाणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत गजबजलेला चौक म्हणून ओळखल्या जाणऱ्या तीन हात नाका येथील वाहतूक नियंत्रण कार्यालयात
(traffic control office) वेगळेच वातावरण पहायला मिळाले.
महिला आणि पुरुष वाहतूक पोलीस आणि अधिकारी सर्वजण मोठ्या आनंदात आणि उत्साहात होते.
कारण पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज खास त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आले होते.

एकनाथ शिंदे यांनी खास दिवाळीच्या निमित्ताने खास वाहतूक पोलिसांची भेट घेऊन त्यांना फराळ आणि मिठाईचे वाटप केले.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, वाहतूक पोलीस (Traffic police) दिवसरात्र शहरातील वाहतुकीची व्यवस्था पाहण्यासाठी काम करतात.
दिवाळीसह प्रत्येक सणाला आपल्या कुटूंबापासून दूर राहून कर्तव्य बजावतात त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेण्यासाठी आज पाडव्याच्या (diwali padwa) निमित्ताने आज इथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, प्रत्येक सणाला पोलीस दक्ष राहून काम करतात.
कोरोना काळात देखील कर्तव्य निभावताना अनेक पोलिसांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन काम केले.
अनेकदा उन पाऊस याची तमा न बाळगता ते रस्त्यावर उभे असतात.
असेच अनेकदा यंत्रणा उशिरा पोहचतात तेव्हा स्वत: तात्पुरते रस्ते दुरुस्त करुन वाहतूक सुरळीत करण्याचे काम वाहतुक पोलीस करतात.
अशावेळी त्यांना देखील आपल्या कुटूंबासोबत दिवाळी साजरी करावीशी वाटते परंतु कर्तव्यभावनेमुळे त्यांना काम करावे लागते.
त्यांच्या याच कर्तव्यनिष्ठेतेची जाण ठेवून आजच्या या दिवाळीचा पाडवा पोलीस बांधवांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title : Eknath Shinde | thane district guardian minister and shivsena leader eknath shinde celebrated diwali with thane city traffic police today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Dhananjay Munde | धनंजय मुंडे बारामतीमध्ये कडाडले, म्हणाले – ‘भाजपला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’

PMGKAY | देशातील 80 कोटी गरीबांना नोव्हेंबरनंतर सुद्धा मिळणार का मोफत रेशन? केंद्रीय सचिवांनी दिली ‘ही’ माहिती

PPF Account Merger Rules | दोन PPF खाते एकाच पीपीएफ अकाऊंटमध्ये विलीन करायची असतील तर जाणून घ्या नियम, येणार नाही कोणतीही अडचण