Eknath Shinde | ठाण्यातील शिवसेनेचे 66 नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सामिल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde | विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठं बंड पुकारलं. त्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं. जवळपास 10 दिवसांच्या बंडाळीनंतर राज्यात अखेर शिंदे गट आणि भाजपने (BJP) सरकार स्थापन केलं. सध्या शिंदे गटात जवळपास अपक्षासह 50 आमदार आहेत. त्याचबरोबर अनेकजण शिवसेनेतून (Shivsena) शिंदे गटात सामील होताना दिसत आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे.

 

ठाणे महानगरपालिकेतील (Thane Municipal Corporation) 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठिंबा दिला आहे. काल (बुधवारी) रात्री या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे 67 नगरसेवक असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) 34, भाजपकडे (BJP) 23, काँग्रेसकडे (Congress) 3 आणि एमआयएमकडे (MIM) 2 नगरसेवक आहेत. ठाणे पालिकेचा कार्यकाळ संपला असून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलीय. तसेच, आगामी काही महिन्यामध्ये ठाणे महापालिकेची निवडणूक (Thane Municipal Election) होण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawali) यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते.
यात भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले होते.
त्यानंतर शिवसेनेचे 12 खासदार फुटणार असल्याची चर्चा सातत्याने रंगली आहे. यात भावना गवळी यांचे नाव आघाडीवर आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भावना गवळी यांना लोकसभेतील प्रतोद पदावरून हटवले. त्यांच्या जागी शिवसेनेचे खासदार राजन विचारे (MP Rajan Vichare) यांची नियुक्ती करण्यात आली होती.

 

Web Title :- Eknath Shinde | thane municipal corporation shivsena 66 corporator join rebel eknath shinde group maharashtra politics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा