Eknath Shinde | ‘या’ 3 कारणांमुळे बंडखोर एकनाथ शिंदे गट गुवाहाटीमध्ये अडकलाय ? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde | आठवडा होत आला तरी शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाचे बंड यशस्वी झाल्याचे दिसत नाही. उलट राज्याबाहेर जाऊन बंड करणारे शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांच्या समोर आता कायदेशीर आणि राजकीय पेच निर्माण झाला आहे. केवळ वेगवेगळी वक्तव्य करण्याशिवाय शिंदे अद्याप काहीही करू शकलेले नाहीत. शिंदे गट मुंबईत (Mumbai) का येत नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

1. शिंदे गट मुंबईत का येत नाही, याची अनेक कारणे आहेत. यापैकी जी तीन प्रमुख कारणे आहेत. त्यातील प्रमुख कारण म्हणजे राज्यपाल कोश्यारी यांची खराब असलेली प्रकृती हे असू शकते. कोश्यारी यांना कोरोना झाला असून आज ते चार दिवसानंतर दवाखान्यातून घरी परतले आहेत. शिंदे गटाला कोणतीही हालचाल करायची असेल तर राज्यपालांशिवाय ती शक्य नाही. त्यामुळे शिंदे गटातील आमदार मुंबईत आलेले नाहीत. कारण या सर्व बंडामागे भाजपाची मोठी भूमिका आहे.

 

2. बंडखोरी उघड झाल्यानंतर शिवसेनेने तातडीने सर्व आमदारांना व्हीप बजावून मीटिंगसाठी बोलावले, जे आले नाहीत त्या बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यात आली. शिवसेनेने आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी सर्व 16 आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीशीचे उत्तर बंडखोर आमदारांना द्यायचे आहे. या नोटीशीला उत्तर देण्याऐवजी शिंदे गट कोर्टात गेला. उपसभापतींवर अविश्वासाचा ठराव प्रलंबित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हा पेच सुटल्यानंतर शिंदे गट मुंबईत येऊ शकतो. (Eknath Shinde)

 

3. बंडखोरीमुळे राज्यभरातील शिवसैनिक संतप्त झाले असून उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्हनंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. मुंबईत आल्यास संतप्त शिवसैनिकांच्या रोषाला बळी पडावे लागेल, यातून मोठा भडका उडू शकतो अशी भीती शिंदे गटाला आहे. या धास्तीमुळेच एकनाथ शिंदे यांनी केंद्राकडे धाव घेतल्याने शिवसेनेच्या 15 बंडखोर आमदारांना वाय प्लस सुरक्ष दिली आहे. त्यांच्या घराभोवती जवान तैनात करण्यात आले आहेत. या भीतीमुळेच शिंदे गट सध्या मुंबईत येऊ शकत नाही.

 

राज्याबाहेर भाजपाशी संपर्क शक्य

शिवसेनेतील बंडामागे भाजपाचा मोठा हात आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड करण्यासाठी प्रथम गुजरातमधील सूरत आणि नंतर गुवाहाटी निवडले.
एकनाथ शिंदे यांना येथून भाजपाशी संपर्क साधणे आणि भेटीगाठी सहज शक्य आहेत.
गुजरातमध्ये देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी शिंदे यांची भेट झाल्याचे सुद्धा वृत्त आहे.
तसेच आता कोश्यारी दवाखान्यातून घरी आल्याने राज्यातील राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

 

Web Title :- Eknath Shinde | three reasons reason eknath shinde group did not come to mumbai know more

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा