Eknath Shinde | भाजपच्या ‘पार्ट टाइम मुख्यमंत्री’च्या टीकेला शिवसेनेचे सडेतोड उत्तर; एकनाथ शिंदे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  Eknath Shinde | भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पार्टटाइम मुख्यमंत्री असल्याची टीका केली होती. तसेच मुख्यमंत्री ठाकरे (CM Thackeray) हे कधी उठतात, कधी झोपतात. कधी काम करतात हे जनतेला माहित आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण यांच्या हातचा मळ झाला आहे, अशा शब्दात ठाकरे सरकारवर निशाणा साधत या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. राज्याला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासारख्या फुलटाइम मुख्यमंत्र्याची आवश्यकता आहे असे रवी यांनी म्हंटले होते. या आरोपाला शिवसेनेने (Eknath Shinde) सडेतोड उत्तर दिल आहे.

 

एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आलेले शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रवी यांच्या विधानासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. ते म्हणाले राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपचे आरोप सुरु आहेत. त्याकडे आम्ही लक्ष देत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राने कोरोनाचे योग्य नियोजन केले. सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या कामाचे कौतुक केलं आहे. राज्य अजूनही कोरोनाचा सामना करत आहे. त्याचबरोबर विकास कामंही करत आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीत मदतही केली आहे. कोरोना संकट, अतिवृष्टी, निसर्ग चक्रीवादळ अशी संकटे आली. मात्र अशा परिस्थितीतही सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. १०-१० हजार कोटींचे दोन्ही वेळेला पॅकेज दिले. पण विकास कामांना कुठेही कात्री लावली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली सरकार चांगलं काम करतंय हे चित्र स्पष्ट दिसत असल्याचे त्यांनी शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हंटले आहे.

 

Web Title : Eknath Shinde | uddhav thackeray part time chief minister shiv sena eknath shinde reply bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Shalu Chourasiya | बागेत फिरणार्‍या अभिनेत्रीवर ‘हल्ला’, चेहर्‍यावर ठोसे मारून केले असे ‘हाल’

MPSC Exam | 20 नोव्हेंबरला असणार्‍या सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र, मार्गदर्शक सूचना जारी

Pune Crime | रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्यानं 8.5 लाखांची फसवणूक; पुण्यातील महिला टीसी अधिकाऱ्याला अटक