Eknath Shinde | उद्धव ठाकरेंनी केलेली चूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दुरुस्त केली आहे – जयकुमार गोरे

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या 2019 सालच्या निवडणुका शिवसेनेने (Shivsena) भाजपसोबत (BJP) युतीमध्ये लढल्या होत्या. तरी देखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपशी गद्दारी करत काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी (NCP) हातमिळवणी केली आणि आणि मुख्यमंत्री झाले. त्यांची ती चूक झाली. आणि ती चूक आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सुधारत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी चाळीस आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करुन ती चूक सुधारली आहे, असे भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) म्हणाले आहेत.

जयकुमार गोरे साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते. भाजपशी युती असताना देखील विधानसभेच्या निवडणुका झाल्यावर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच भाजपशी गद्दारी करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. या सरकारमध्ये आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) देखील होते. आता ते गावोगावी फिरुन त्यांना गद्दार गद्दार म्हणत आहेत. पण खरी गद्दारी ही त्यांनीच केली आहे. ही खरी गद्दारी असून, उद्धव ठाकरे यांनी भाजप पक्षाशी केलेली गद्दारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरुस्त केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस आमदारांवर होत असलेली गद्दारीची टीका ही चुकीची आहे, असे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे म्हणाले.

यावेळी जयकुमार गोरे यांनी चाळीस आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली आहे

Web Title :-  Eknath Shinde | Uddhav Thackeray’s mistake has been corrected by Chief Minister Eknath Shinde – Jayakumar Gore

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Boney Kapoor | बोनी कपूरने साधला अक्षय कुमारवर निशाणा! म्हणाले ’25-30 दिवसात चित्रपट करणारे…’

T20 World Cup | ‘या’ दोन टीममध्ये होणार टी20 वर्ल्ड कपची फायनल, ‘या’ दिग्गज खेळाडूने वर्तवली भविष्यवाणी

Leslie Phillips Passed Away | हॅरी पॉटर स्टार लेस्ली फिलिप्स यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन

Jitendra Awhad | ठाण्यातील ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा प्रयोग बंद पाडल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांची नोटीस