Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | एकनाथ शिंदेंसोबत गेलेले ‘हे’ 12 आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार?

चंद्रपूर : Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | श्रीनिवास वनगा, लता सोनवणे, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, चिमणराव पाटील, नितीनकुमार तळे, प्रदीप जैसवाल, उदयसिंह राजपूत, महेश शिंदे, प्रकाश आबिटकर हे १२ आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत (Shivsena UBT) परतणार आहेत, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे वकील असीम सरोदेंनी केला. चंद्रपूर येथील सभेत बोलताना सरोदे यांनी ही यादीच वाचून दाखवली.(Eknath Shinde Vs Uddhav Thackeray)

असीम सरोदे म्हणाले, हे बारा आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात परतण्यास तयार आहेत. कारण त्यांच्या लक्षात आले आहे की यांच्यासोबत आपले भविष्य नाही, यांना ठाणे जिल्ह्याच्या बाहेर ओळख नाही. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचेही अनेक नेते शरद पवारांकडे परत येतील अशा चर्चा सुरु आहे.

लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. इच्छूक उमेदवारांची नाराजी, आरोप-प्रत्यारोपांचे प्रमाण वाढले आहे. तसेच राजकीय हालचालींना देखील वेग आला आहे. अशावेळी असीम सरोदे यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. जर सरोदे यांचा दावा खरा ठरला तर शिंदे गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lonikand Crime | प्रवासी महिलेसोबत कारमध्ये गैरवर्तन, उबेर चालकावर गुन्हा दाखल; लोणीकंद परिसरातील घटना