Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | उध्दव ठाकरेंना आणखी एक धक्का! न्यायालयीन लढाई सुरू शिवसेनेच्या 8 राज्यप्रमुखांनी दिला शिंदेगटाला पाठिंबा

मुंबई : Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | भाजपाच्या मदतीने शिवसेनेला बंडखोरीचा सुरूंग लावून राज्यातील सत्तांतर घडवत स्वता मुख्यमंत्री विराजमान झालेले एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सातत्याने शिवसेनेला धक्के देत आहेत. शिवसेनेवर (Shivsena) शिंदेगट (Eknath Shinde Group) हक्क सांगत असून हा वादा न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे आहे. मात्र, शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेचे 8 राज्यप्रमुखांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. मात्र याचा कायदेशीरदृष्टया शिवसेनेवर कोणता परिणाम होईल हे स्पष्ट नाही. (Eknath Shinde Vs Uddhav Thackeray)

न्यायालय आणि निवडणुकी आयोग यांच्यापुढे सध्या शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आहे. याबाबतीत लवकरच निर्णय होणार आहे. अशावेळी दिल्ली, छत्तीसगड, मणीपूर, गोवा, बिहार यासह इतर राज्यांच्या शिवसेनेच्या राज्य प्रमुखांनी तसेच पदाधिकार्‍यांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. हा शिवसेनेसाठी आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.

शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा निवडणूक आयोगासमोर केला आहे.
तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हं गोठवावे अशी मागणीदेखील शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.
तसेच सुप्रीम कोर्टात शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई करावी, यासह इतर मुद्यांवर सुनावणी सुरू आहे.
शिंदे गटाने सुप्रीम कोर्टासमोर निवडणूक आयोगाला सुनावणी घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.
यावर सुप्रीम कोर्टात 29 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होईल.

Web Title :- Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | state leaders of shiv sena other than maharashtra join eknath shinde set back to uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतरच्या मेगाब्लॉकचे नियोजन

Pune Crime | पूर्व वैमनस्यातून कोयत्याने वार करुन गुंडाचा युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न