Eknath Shinde | संजय राऊतांच्या ‘परत या’ आवाहनानंतर एकनाथ शिंदेचं थेट उत्तर; म्हणाले – ‘आता गाडी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde | राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच आज वर्षा निवासस्थानाबाहेर पत्रकार परिषद घेत शिवसेनेचे आमदार नितीन देशुमख (MLA Nitin Deshmukh) यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर (BJP) गंभीर आरोप केले आहेत. जीव धोक्यात घालून मी सुरतहून स्वत:ची सुटका केली, असा दावा त्यांनी केला. त्याचबरोबर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील महाविकास आघाडी सरकारमधून (Mahavikas Aghadi Government) बाहेर पडण्यास तयार आहे पण तुम्ही मुंबईत या, असं आवाहन शिंदे गटातील आमदारांना केलं. दरम्यान यानंतर बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.

 

“तुम्ही 24 तासात परत या. सरकारमधून बाहेर पडण्याबाबत विचार होईल. तुमचं म्हणणं ऐकून घेऊ. तुमच्या भूमिकेवर विचार करू,” असं संजय राऊत म्हणाले. यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, “आमच्याकडे 40 आमदार असल्याने माघारी जाण्याचा प्रश्नच नाही. आता गाडी खूप पुढे गेली आहे. आम्ही बैठक घेऊन पुढे काय करणार हे सांगू. बहुमत आमच्याकडेच आहे, याबाबत आम्हाला खात्री आहे,” असं देखील शिंदे यांनी म्हटलं आहे.

 

त्याचबरोबर नितीन देशमुख यांच्या आरोपानंतर आता एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी स्वत: आमची काही लोकं त्यांना सोडवण्यासाठी पाठवली होती. त्यांचे सर्व आरोप निराधार असल्याचं शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटलं आहे. हे सर्व खोटं असल्याचा दावा देखील शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

 

Web Title :- Eknath Shinde | we have 40 mla no point going back eknath shinde reaction on sanjay raut appeal

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा