मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधान परिषदेच्या निकालानंतर (Vidhan Parishad Election 2022) राज्यात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह काही समर्थक आमदार गुजरातच्या सूरत येथे हॉटेलमध्ये मुक्कामी आहे. तर शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर (Shiv Sena Leaders Milind Narvekar), रवींद्र फाटक (Ravindra Phatak) सूरतला पोहचले. यावेळी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यात फोनवरुन 15 मिनिटे संवाद झाला. नार्वेकरांच्या फोनवरुन दोन्ही नेत्यांचे बोलणं झालं.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या संवादादरम्यान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजप (BJP) सोबत सत्ता स्थापन करण्याची मागणी केल्याची माहिती मिळत आहे. मला मंत्रीपद नाही दिलं तरी चालेल पण भाजपसोबत युती (BJP Alliance) करावी असं त्यांनी म्हटलं. यावर मुख्यमंत्र्यांनी चर्चा करु, तुम्ही पहिला मुंबईत या असा संदेश दिल्याची माहिती आहे. आज पुन्हा एकदा शिवसेना आमदारांची आणि नेत्यांची बैठक होणार आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) कोणताही ताळमेळ नाही, आमदार (MLA) आणि मंत्र्याचीही तीच भूमिका आहे. पक्षाची विचारधारा ही हिंदुत्वाची आहे, त्यामुळे भाजपासोबत युती करणे हिच काळाची गरज आहे.
या संवादात एकनाथ शिंदे यांनी तुम्ही तुमचं ठरवा, मी माझं ठरवतो असं संतापून म्हणाले.
एकीकडे चर्चा, दुसरीकडे अपहरणाचा आरोप, तिसरीकडे गटनेते पदावरून (Group Leader) काढलं असं का केलं?
यावेळी शिंदे म्हणाले, मी कुठलाही गट अथवा पक्ष स्थापन केलेला नाही. कुठेही मुख्यमंत्रिपदाबाबत बोललो नाही मग गटनेते पदावरून काढलं का?
संजय राऊत (Sanjay Raut) माझ्याशी फोनवर चांगले बोलतात आणि वारंवार प्रसारमाध्यमांसमोर माझ्याविरोधात बोलतायेत.
भूमिका मांडायची मग मुंबईत या असं बोलतायेत. मग प्रसारमाध्यमांमध्ये वेगळं का बोलतात असा सवाल करत त्यांनी संजय राऊत यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली.
त्याचसोबत हिंदुत्वाच्या आधारे शिवसेना-भाजपा युती (Shiv Sena-BJP Alliance) व्हावी हा आपला मद्दा आहे.
मी कुठलाही पक्षविरोधी कारवाई केली नाही तरी गटनेते पदावरुन काढलं. काही नेते माझ्याशी फोनवर बोलतात.
पण प्रसारमाध्यमांशी वेगळा संवाद का? शिवसेनेचे नेते माझ्यासाठी चर्चा करायला येत असतील तर इतर नेत्यांना याची कल्पना नाही का
लवकरच आपली भूमिका जाहीर करु असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
Web Title :- Eknath Shinde | why was the group leader removed from the post phone conversation between shivsena leader and maharashtra minister eknath shinde and cm uddhav thackeray
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update