‘अल्ट बालाजी Pron तयार करत नाही’; ‘या’ अभिनेत्याचा एकता कपूरला पाठिंबा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   फिल्म आणि टीव्हीची प्रोड्युसर एकता कपूर (Ekta Kapoor) सध्या आपल्या मालिकांसाठी खूपच फेमस आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून ओटीटी प्लॅटफॉर्म अल्ट बालाजी (ALTBalaji) वरील तिच्या काही वेब सीरिज गंदी बात आणि एक्स एक्स एक्स ( (XXX) वादात सापडताना दिसत आहे. तिच्या सीरिजमधून अश्लीलता पसरवली जात असल्याचा आरोप केला जात आहे. अभिनेता अमर उपाध्ये यानं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जर तुम्हाला एखादी सीरिज आवडत नसेल, तर तुम्ही पाहू नका, असा सल्ला त्यानं टीकाकारांना दिला आहे.

आपल्या आगामी सीरिजच्या निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना अमरनं एकता कपूरला पाठिंबा दिला आहे. अमर म्हणाला, बालाजी टेली फिल्म्स एक प्रॉडक्शन हाऊस आहे. सिनेमा आणि मालिकांची निर्मिती करणं हा त्यांचा व्यवसाय आहे. कोणत्याही कलाकृतीची निर्मिती करण्याआधी ते रिसर्च करतात. आज भारतात विविध प्रकारचे प्रेक्षक आहेत. काहींना काटून आवडतं, काहींना डेली सोप आवडतात, काहींना ड्रामा आवडतो, तर काहींना अ‍ॅडल्ट कंटेट असणाऱ्या सीरिज आवडतात. अल्ट बालाजीवर सर्व प्रकराच्या सीरिज तयार केल्या जातात; परंतु काही जण मुद्दाम अ‍ॅडल्ट सीरिजवर निशाणा साधतात. या सीरिज पॉर्न सिनेमांसारख्या नसतात.

अमर म्हणाला, बॉलिवूड सिनेमात ज्या प्रकारची दृश्ये सर्रास दाखवली जातात, तशीच दृश्ये या वेब सीरिजमध्ये दाखवली जातात. याशिवाय अ‍ॅडल्ट सीरिज पाहणारा एक मोठा वर्ग भारतात आहे. त्यांना एकताच्या सीरिज आवडतात. अशा प्रेक्षक वर्गासाठी या सीरिजची निर्मिती केली जाते. ज्यांना असा कंटेट पाहणं आवडत नाही, त्यांनी पाहू नये. आज तुमच्याकडे पाहण्यासाठी अनके पर्याय आहेत, असं म्हणत अमरनं एकताला पाठिंबा दिला आहे.

अमरच्या वर्कफ्रंटबद्द बोलायचं झालं, तर क्यों की सास भी कभी बहू थी या मालिकेतून लोकप्रिय झाला आहे. आता तो एका नव्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोलक्की असं या वेब सीरिजचं नाव आहे.