एकता कपूर आणि करण जोहरचं होत होतं ‘लग्न’ ! परंतु अचानक झालं ‘असं’ काही

पोलिसनामा ऑनलाइन –डायरेक्टर आणि निर्माता करण जोहर आणि टीव्हीची क्वीन म्हणवली जाणारी एकता कपूर यांच्या मैत्रीबद्दल सर्वांनाच कल्पना आहे. सरोगेसी पॅरेंट आणि बॉलिवूड असे अनेक मुद्दे त्यांच्यात सारखे आहेत. दोघांची बाँडिंग साऱ्या दुनियेला माहिती आहे. एकदा अशी काही बातमी आली होती ज्यानंतर सर्वच हैराण झाले होते.

एक काळ असा होता जेव्हा करण जोहर आणि एकता कपूर यांच्या लग्नाच्या बातम्या चर्चेत होत्या. दोघांच्या नात्याबद्दल खूप चर्चा झाली होती. एका मुलाखतीत करणनं असं काही वक्तव्य केलं होतं ज्यानंतर हे सगळं सुरू झालं होतं. करण म्हणाला होता की, “जर मला किंवा एकतला योग्य जोडीदार मिळाला नाही तर आम्ही एकमेकांसोबत लग्न करू.”

करण असंही म्हणाला होता, जर असं झालंच सर्वात जास्त आनंद माझ्या आईला होईल. कारण एकता सून झाल्यानंतर आईला मालिकेतील पुढचे सर्व एपिसोड माहिती होतील आणि ती खुश होईल.

आजही करण आणि एकता यांच्यात चांगली बाँडिंग आहे. आजही ते एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया देत असतात.