मानवी लिंगासोबत ‘चेतक’ची तुलना केल्यानं एकता कपूरविरोधात ‘FIR’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्हीची क्वी़न म्हणून ओळखली जाणारी एकता कपूरविरोधात नुकताच प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकतानं मानवी लिंगाची तुलना लोक देवताच्या रुपात पूजल्या जाणाऱ्या महाराणा प्रताप यांचा स्वामी भक्त घोडा चेतकसोबत केली. तसंच त्यांचा सीरीजमध्येही चेतकचं नाव चुकीच्या पद्धतीनं घेतल्यानं जुन्या इतिहासासोबत छेडछाड केल्याबद्दल प्रतापनगर ठाण्यात एकता कपूर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सिंघानिया लॉ कॉलेजचे डीन डॉक्टर धर्मेश कुमार जैन यांनी अ‍ॅड हरिश पालीवाल मार्फत बालाजी टेलिफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या टीमचे सदस्य लेखक, कॅमेरामन आणि कलाकारासहित प्रोपायटर, दिग्दर्शक एकता कपूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. असंही म्हटलं आहे की, एकता कपूरच्या गंदी बात या वेब सीरीजच्या नव्या सीजनमध्ये स्वामीभक्त आणि लोक देवतेच्या रुपात पुजल्या जाणाऱ्या चेतक नावाला खूपच चुकीच्या पद्धतीनं घेतलं गेलं आहे.

याशिवाय इतिहासासोबतही छेडछाड केल्याचं म्हटलं आहे जे चुकीचं आहे. अर्जदारानं एकता कपूर सहित पूर्ण टीमवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like