वेबसीरिजमधील ‘त्या’ दृश्यामुळे एकता कपूर पुन्हा वादात

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा कहर आणि सुशातंच्या आत्महत्याबाबतीत राजकारण पेटले असताना हिंदी मालिकांवर राज्य करणारी निर्माती एकता कपूर सध्या बेव सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजमध्ये एका वेगळ्या सीनसाठी अहिल्याबाई होळकर यांचे नाव हॉस्टेलला देण्यात आल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

एकता कपूरची ‘व्हर्जिन भास्कर 2’ नावाची एक नवी वेब सीरिज प्रसारित झाली आहे. सीरिजमध्ये एका हॉस्टेलमध्ये काही बेकायदेशीर कामे केली जात असल्याचे दाखविण्यात आले आहे. या हॉस्टेलचे नाव ‘अहिल्याबाई होळकर’ असे ठेवले आहे. या नावामुळे प्रेक्षकांनी राग व्यक्त केला आहे. 40 ते 50 जणांच्या जमावाने एकताच्या बंगल्याभोवती निदर्शने केली. तिच्या घरावर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या वंशजांनी प्रॉडक्शन हाऊसला पत्र लिहून ‘व्हर्जिन भास्कर 2’ मधील तो सीन हटवण्याची मागणी केली आहे.अहिल्यादेवी अत्यंत बुद्धिमान, प्रखर विचारवंत आणि स्वाभिमानी राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. विविध विषयांवर दररोज त्या विपुल विचार विनिमय करायच्या जनतेच्या समस्या ऐकून त्यांची सोडवणूक करायच्या. त्यांनी प्रजेसाठी अनेक कामे केली. त्यांनी केलेल्या महान कार्यामुळे आजही लोक त्यांचे नाव घेतात. इतक्या मोठ्या व्यक्तीचं नाव अशा प्रकारे वापरणे चुकीचे असल्याची भावना या आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.