सुशांतच्या स्मरणार्थ एकता कपूरची मोठी घोषणा ! तुम्हीही कराल ‘कौतुक’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सुशांत सिंह राजपूतला जाऊन आता एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. असं असलं तरीही चाहते मात्र अजूनही दु:खात दिसत आहेत. असं असतानाच आता प्रसिद्ध प्रोड्युसर एकता कपूर हिनं एक मोठी घोषणा केली आहे. एकतानं सुशांतला श्रद्धांजली देत त्याच्या स्मरणार्थ मेंटल हेल्थ अवेरनेस फंड सुरू करण्याची घोषणा केली आहे. खास बात अशी की, या फंडचं नावदेखील सुशांतच्या मालिकेवरूनच पवित्र रिश्ता ठेवण्यात आलं आहे. एकता आणि तरूण कतियाल यासाठी एकत्र काम करणार आहेत. याचा हेतू लोकांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी जनजागृती करणं हा आहे.

याबद्दल बोलताना एकता कपूर म्हणाली, “गेल्या 10 वर्षात खूप काही बदललं आहे. आज प्रत्येक गोष्टीचा दबाव असतो. अशा महामारीच्या काळात आपण सर्व घरात बंदिस्त आहोत. सर्वांनाच तणाव आणि बेचैनीचा सामना करावा लागत आहे. नोकरी आणि पैसा यामुळं तणाव वाढत चालला आहे. अनेक लोकांचं मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. पवित्र रिश्ता फंडचा हिस्सा बनल्यांतर मी तर खूप खुश आहे. पुढेही अशा प्रकारच्या उपक्रमात सामिल होऊन खुश राहिन.”

एकता कपूरनंच सुशांतला इंडस्ट्रीत लाँच केलं होतं. सुशांतनं एकताच्या पवित्र रिश्ता मालिकेतून करिअरला सुरुवात केली होती. या मालिकेनं त्याला खूप लोकप्रियता मिळाली होती.